तीन वर्षाच्या चिमुकलीने ठेवला आपल्या जीवनाचा पहिला रोजा

0 140

सेलू ( नारायण पाटील )
वय अवघं 3 वर्षाचं, तरी ती गुरुवारी पहाटे 5.11मिनिटांनी ती उठली व सहेर केली , दिवस भर तिने भक्तीभावाने नमाज अदा केला आणि साय.6.38 मिनटांपर्यंत तिने ना अन्न मागितले ना पाणी. तब्बल बारा तासांहून अधिक काळ तिने निर्जली रोजा ठेवला आणि मग इफ्तार केला. इतक्या छोट्या वयात रुमेसा साबेर शेख रा. विद्यानगर सेलू येथील राहिवशी आहेत हिने ठेवलेल्या या रोजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू असून, आज दोन (उपवास) पूर्ण झाले आहेत. यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे रखरखत्या उन्हात पाण्याचा थेंबही न पिता जवळपास 12 ते 13 तास राहण्याची शक्तीच जणू देव या दिवसांमध्ये देत असल्याची भावना रोजा करणाऱ्यांमध्ये असते. त्यातून त्यांचा रोजा पूर्ण होतो. सेलू परिसरातील रुमेसा ने रोजा ठेवला आणि संपूर्ण 12 तास निर्जली राहिली, त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.
रमजानचा महिना मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात पवित्र असतो. या पवित्र महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते. रमजानचा महिना कधी 29 दिवसांचा असतो तर कधी 30 दिवसांचा असतो. रमजान सुरू होताच मुस्लिम लोकं रोजा सुरू करतात. यावर्षी हा पवित्र महिना 12 मार्चपासून सुरू झाला आहे. रोजाची सुरुवात सकाळी सेहरीने होते आणि त्यानंतर संध्याकाळी इफ्तारने रोजा सोडला जातो.या रुमेसा ने रोजा ठेवल्या मुळे शेख साबेर, शेख शोहेब, शेख इम्रान, शेख अबूजर, शेख उबेद, खलील बागवान, शेख जुबेर, शेख यासंर, शेख उमर, सोफिन मोदी, पठाण असगर नी कौतुक व अभिनंदन केले आहे

error: Content is protected !!