मंत्रालयात तरुणाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ

0 11

मुंबई : मंत्रालयातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका तरुणाने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. मात्र तिथे लावलेल्या संरक्षक जाळ्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. बापू नारायण मोकाशी असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने धक्कादायक दावा केला आहे. आपल्या प्रेयसीवर बलात्कार झाला आहे. मी या प्रकरणात उद्धव ठाकरे यांना चार पत्र लिहिली होती, मात्र काहीच झालं नाही असा दावा या तरुणाने केला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचं समोर आलं आहे.

तरुण मानसिक रुग्ण असल्याची माहिती  

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येचा प्रयत्न कराणारा हा तरुण मानसिक रुग्ण  असल्याचं समोर आलं आहे.  त्याने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे. या तरुणाने यावेळी आपल्या घरच्यांवर देखील आरोप केले आहेत.बापू मोकाशी नावाच्या या तरुणाने आज मंत्रालयावर चढून आत्महत्येचा प्रयत्न  केला. त्याने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. मात्र मंत्रालयात लावलेल्या संरक्षक जाळीमुळे या तरुणाचा प्राण वाचला आहे. हा तरुण संरक्षक जाळीत अडकला. या घटनेत तरुणाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून,  या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
error: Content is protected !!