उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशास उपआयुक्त औरंगाबाद कार्यालयाची स्थगिती

0 23

 

रमेश बिजुले
पाथरी,दि 21 ः
मो. वाघाळा येथील जी. प. शाळेचे बांधकाम स.न. 380 मधील असलेली इमारत हि 1932 पासून अस्तित्वात आहे, त्यासंबंधी गावातील लक्ष्मण कठाळू घुंबरे यांनी तलाठी यांचेकडे अर्ज देऊन जी. प. शाळेच्य ताब्यातील सदरील जागा स्वताच्या नावे करून घेतली होती. त्यासंबंधी मुख्याध्यापक जी. प. प्रशाला वाघाळा ता. पाथरी यांनी उप विभागीय अधिकारी पाथरी यांचेकडे अर्ज सादर करून झालेला फेर रद्द करण्यात येऊन सदर स. न. मध्ये 7/12 वर जी. प. शाळेचे नाव नोंदविण्यात यावे म्हणून अपील केलें होतें, सदर अपील मंजूर करण्यात येऊन उप विभागीय अधिकारी पाथरी यांनी सदरचा फेर रद्द करून निकाल हा जि.प. प्रशाला वाघाळा यांच्या वतीने दिला.

उप विभगीय अधिकारी पाथरी यांच्या आदेशास लक्ष्मण घुंबरे यांनी अप्पर जिल्हाधिकारी परभणी यांच्या समोर आव्हान दिल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी परभणी यांनी दी.30/05/2022 रोजी उपविभागीय अधिकारी पाथरी यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करत अपिलार्थी लक्ष्मण घुंबरे यांचे अपील अंशत मंजूर करून तहसीलदार पाथरी यांना आदेशित करून जी. प च्य नावे असणारी काहीं जमीन अपील कर्ता लक्ष्मण घुंबरे यांच्या नावे करण्याचे आदेश दिले होते. सदर निर्णयाच्या नाराजीने जी. प. परभणी तर्फे मा. आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांचे समोर ॲड. आरती ब्रम्हनाथकर यांच्या मार्फत अपील दाखल करण्यात आले, सदर अपिलामध्ये स्थगिती अर्जावर सुनावणी घेण्यात येऊन जी. प. परभणी च्या वतीने ॲड. आरती ब्रम्हनाथकर यांनी मांडलेले मुद्दे व केलेला युक्तिवाद विचारत घेऊन मा. उप आयुक्त साहेब औरंगाबाद यांनी अप्पर जल्हाधिकारी परभणी यांनी दी.30/05/2022 रोजी पारित केलेल्या निर्णयास स्थगिती देण्यात आलेली आहे.
सदर निर्णयामुळे मो. वाघाळा येथील जी. प. शाळेचे अस्तित्व सुरक्षित झालेले आहे, त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी मा. उप आयुक्त औरंगाबाद यांच्या स्थगिती आदेशाचे स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!