समाज बांधवांना सहाय्य करून लेवा समाज प्रगत करा – बदलापूर येथे लेवापटीदार मेळाव्यात मान्यवरांचे सूर

0 28

 

बदलापूर, खेमचंद पाटील – बदलापूर येथील लेवा पाटीदार समाजातील तरुण पिढी एकत्र यावी आणि समाजाच्या सर्व घटकांचा विकास व्हावा या उद्देशाने आपण समाजाचे काही तरी देणे लागतो. त्या निमित्ताने ७ ऑगस्ट रोजी गेट टूगेडर च्या माध्यमातून समाजाची सर्व तरुण मित्र मंडळ एकत्र आणून एक छोटेखानी समाज एकत्रित कर

ण्याचा कार्यक्रम मान्यवर लेवा पाटीदार समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.

सदर कार्यक्रम एरंजड येथील झोपे फार्म हाऊस येथे घेण्यात आला . शहरात समाज समाज बांधवांची संख्या खूप असल्याने समाजाला एकत्रीकरणाचा फायदा नक्कीच होईल. त्या वेळी समाजाची पुढील वाटचालीबद्दल रूप रेषा ठरवण्यात आली. त्या सोबत बांधवांच्या सुख दुःखात एकत्र येऊन त्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे. तसेच समाजाची ताकद व समाजात घडणाऱ्या योग्य घटनांना सहकार्य करणे गरजेचे आहे. एकमेकांना मदत व सहकार्य करून समाज प्रगती पथावर नेण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन उपस्थित लेवा पाटीदार समाज बांधवांना केले.

 

तसेच शहरात वास्तव्यास असलेले डॉ. चेतन महाजन, डॉ. भंगाळे डॉ. भूषण कोल्हे यांनी समाजात प्रति आदर करत व्यक्त करत मदतीचे आश्वासन दिले.
कार्यक्रमास बदलापूर लेवा पाटीदार समाज मंडळाचे अध्यक्ष गेंदा पाटील , सचिव पियूष पाटील, मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास पाटील, रमेश पाटील यांच्या सह सोपान धांडे, शिरीष भारंबे, किरण बोंडे, विकास फिरके, हितेश भोळे, किरण बोंडे यांनी तरुण पिढीला आणि उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!