अखेर.. खासदार गजानन कीर्तिकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत

0 197

मुंबई : तळ्यात-मळ्यात करणारे खासदार गजानन कीर्तिकर  अखेर शिंदे गटात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत कीर्तिकरांनी अधिकृतपणे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कीर्तिकरांची चलबिचल सुरु होती. अखेर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.कीर्तिकरांनी शिंदेंची साथ दिल्याने आता त्यांच्यासोबत असलेल्या लोकसभा खासदारांची संख्या १३ वर गेली आहे, तर राज्यसभेचे तीन खासदार धरुन ठाकरेंकडे 9 खासदार राहिले आहेत.नुकताच ठाकरे गटाच्या लोकाधिकार समिती महासंघाचा कार्यक्रम झाला. गजानन कीर्तिकर या महासंघाचाचे अध्यक्ष आहेत. शिवसेना भवनातील महासंघाचाच्या कार्यालायचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र खुद्द अध्यक्षपदी असलेल्या कीर्तिकरांनीच कार्यक्रमाला गैरहजेरी लावल्याने चर्चांना उधाण आले होते.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेले गजानन कीर्तिकर स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजी कीर्तिकर यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली होती. अगदी दसरा मेळाव्यातही थेट माध्यमांसमोर कीर्तीकरांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

गजानन किर्तीकर मागील काही दिवसांपासून द्विधा मनस्थितीत असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी गोरेगावच्या नेस्को मैदानात आणि शिवतीर्थावर बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करुन चूकच केली, ती चूक पुन्हा नको, असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यानंतर कीर्तिकर शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची भेट घेतल्याने हा सस्पेन्स अधिकच वाढला होता.

कोण आहेत गजानन कीर्तिकर?

गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे दिग्गज नेते असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
१९९० ते २००९ या काळात चार वेळा आमदार राहिले आहे
कीर्तिकर हे मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते.
शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुरुदास कामत यांचा अंदाजे १,८३,००० मतांच्या फरकाने पराभव केला.
ते सलग दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

error: Content is protected !!