तब्बल १४ वर्षांनंतर ‘या’ कलाकाराने सोडला ‘तारक मेहता…’ शो

0 103

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे दिग्दर्शक (Director) मालव राजदा (Malav Rajda) यांनी तब्बल 14 वर्षांनी या मालिकेची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मालव राजदा यांच्या या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मालव राजदा यांनी 15 डिसेंबरला तारक मेहता मालिकेचं शेवटचं शुटिंग केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालव राजदा आणि प्रोडक्शन हाऊसदरम्यान काही वाद सुरु होता. या कारणाने मालव राजदा यांनी तडकाफडकी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

 

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेली १४ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकरांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.

 

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतूनच अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमुळे ‘दयाबेन’ची भूमिका साकारणारी दिशा वकानी व ‘तारक मेहता’च्या भूमिकेत दिसणारे शैलेश लोढा घराघरात पोहोचले होते. वैयक्तिक कारणामुळे या दोघांनीही मालिका सोडली. त्यानंतर आता या मालिकेच्या दिग्दर्शकांनीही तारक मेहता का उलटा चष्माला रामराम ठोकला आहे.

 

 

छोट्या पडद्यावरील (Television) सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक काळ चालणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). या प्रसिद्ध मालिकेतील पात्र घराघरात पोहोचली आहेत. तब्बल चौदा वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण गेल्या काही काळात या मालिकेतील कलाकार एकामागोमाग एक मालिकेतून बाहेर पडत आहेत. दिशा वकानी (Disha Vakani), शैलेश लोढा (Shailesh Lodha), गुरुचरण सोढी अशा अनेक कलाकारांनी या मालिकेला अलिवदा केला आहे. आता मालिकेचे दिग्दर्शकच या मालिकेतून बाहेर पडले आहेत.

error: Content is protected !!