महाराजांबद्दल अजित पवार चुकीचे बोलले’, संभाजीराजेंनी स्पष्ट शब्दात ठणकावलं

0 161

कोल्हापूर: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी जे विधान केलं, त्याबाबत कोणता संदर्भ दिला मला माहीत नाही. पण अजितदादा बोलले ते अर्धसत्य आहे. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होतेच. पण ते धर्मवीरही होते. त्याबाबतचे अनेक पुरावे अस्तित्वात आहेत, असं माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. संभाजी छत्रपती पत्रकार परिषदेत बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीसाहेब यांनी या हिंदवी स्वराज्याचं संरक्षण केलं. त्याबद्दल दुमत नाही. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते हे निश्चित आहे. तसेच संभाजी महाराजांनी धर्माचंही रक्षण केलं हे कोणीही नाकारू शकत नाही.

म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर आहेतच, त्यापाठोपाठ ते धर्मरक्षकही आहेत. हे म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. त्यामुळे तुम्ही इतिहासाची मोडतोड करू नका, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.

संभाजी महाराज धर्मवीर होते. त्याबाबतचे अनेक पुरावे आहेत. संभाजी महाराज हे स्वराज्यवीर आहेत. धर्माचे रक्षक आहेत. धर्मवीर असल्याचे हे पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन ते विधान केलं. ते त्यांनीच सांगावं.
कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर भाष्य करताना त्यावर अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका, अशी माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती राहील, असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना अजित पवार यांनी म्हटलं होतं की, ‘आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही,’ असं वक्तव्य अजित पवारांनी केले होते. या विधानावर आक्षेप घेत अजित पवारांनी धर्मवीर संभाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांना विरोधी पक्षनेतेपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा हल्लाबोल भाजपकडून केला जात आहे.

error: Content is protected !!