आखाडा बाळापूर पोलिसांची जुगारावर कार्यवाही, शहर व परिसरातील अनेक जुगार बंद कधी होणार ?

0 77

आखाडा बाळापूर,दि 13 (प्रतिनिधी)ः
 आखाडा बाळापूर येथे पोलिसांनी जुगार आड्यावर धाड टाकून 6 हजार 820 रु,चा मुद्देमाल जप्त केला . आखाडा बाळापूर मध्ये बऱ्याच दिवसा नंतर पोलिसांनी जुगारावर कारवाही केली.पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुकही होत असून आणि त्या बाबत जाणकार संशय ही व्यक्त करीत आहेत.
नांदेड हिंगोली महामार्ग लगत असलेल्या ठिकाणी 7 जुगार खेळनाऱ्यांना पकडले व रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले परंतु त्या सोबत त्यांचे मोबाईल व मोटर सायकल ही नेण्यात आले होत्या ,त्या सर्व साहित्याचा मुद्देमालात उल्लेख नाही ,शिवाय आरोपींचे मोबाईल पोलिसांनी घेतले आसल्याचे आरोपी सांगतात मग नेमके काय झाले?असा प्रश्न उपस्थित होत आहे.मोटोर सायकल ,आरोपी हे सर्व पोलिस स्टेशन च्या सीसी टीव्ही मध्ये आले असतील .या बाबत ही शंका उपस्थित केली जात आहे. गेल्या अनेक महिन्या पासून प्रशस्त जाग्यावर जुगार नेहमी चालू असतो ,अनेक ठिकाणी चालू असताना तसेच परिसरात ही जुगाराचे अड्डे दिसतात .त्या मुळे अनेक दिवसांनी पोलिसानी केलेली कार्यवाही ही केवळ औपचारिकता होती काय ? इतर ठिकाणी 12 ही महिने चालणाऱ्या जुगार अड्डीवर धाड का पडत नाही .असा प्रश्न ही अनेक जुगार खेळणारे खाजगीत विचारताना दिसतात. तसेच उर्वरीत परिसरातील जुगार अड्ड्याचे काय असा प्रश्न सुजाण नागरिक विचारत आहेत.

error: Content is protected !!