माझे सर्व विद्यार्थी हिच माझी संपत्ती – प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी

गुरुवर्य कृतज्ञता स्नेह संमेलन संपन्न

0 55

सेलू,दि 25 (प्रतिनिधी)ः
माझे सर्व विद्यार्थी हिच माझी खरी संपत्ती असून, मी माझ्या यशस्वी विद्यार्थ्यांना बघतो तेव्हा खूप समाधान वाटते. असे प्रतिपादन नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. शहरातील गणेश नगर मध्ये कवी सुरेश हिवाळे यांच्या निवासस्थानी माजी विद्यार्थ्यांनी गुरुवर्य कृतज्ञता स्नेह संमेलनाचे बुधवार ( दि.२४ ) रोजी आयोजन केले होते. या कार्यक्रमात श्री शिवाजी महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य किसन चोपडे यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांचा वाढदिवस व या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी होऊ घातलेल्या सेवा निवृत्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी म्हणाले की, ‘ ही खुप संस्कारित व महत्त्वाची गोष्ट आहे की, आजच्या काळातही विद्यार्थी यशोशिखरे गाठताना आई-वडील, गुरूजनांची कृतज्ञतेने आठवण ठेवतात. गुरूजन – विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध असेच सुंदर चिरंतन राहायला हवेत.’ या माजी विद्यार्थी गुरुवर्य कृतज्ञता स्नेह संमेलनास डॉ. कल्पना कदम ( नांदेड ), डॉ. भालचंद्र धर्मापुरीकर ( परभणी ) , डॉ. सचिन शेवतेकर ( अंबड ) हे माजी विद्यार्थी तर सुनंदा कुलकर्णी, प्रा. प्रकाश कुरूंदकर , रोहीणी कुलकर्णी , कांचन हिवाळे , सुनिता शिंदे, अनुष्का हिवाळे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सुरेश हिवाळे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. नागेश कान्हेकर यांनी केले.

error: Content is protected !!