अंबरनाथ येथे छाया रुग्णालयात स्वतंत्र ओ पी डी व कोरोनाच्या रुग्णासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याची सुचना

अंबरनाथ, प्रतिनिधी – अंबरनाथ येथे वाढत्या कोरोना बाधिताची संख्या व छोट्या मोठ्या आजाराचा विचार करता अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर ह्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व शहरातील लोकांना छोट्या मोठ्या आजारासाठी मोठ्या हाँस्पीटल मध्ये दाखवावे लागत असून मोठे बिल या सर्वाचा विचार करून शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेबांनी सर्व सामान्य माणसाला योग्य तो उपचार व कोरोनाची संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य शासनाच्या छाया रुग्णालय येथे स्वतंत्र ओ पी डी व कोरोना च्या रुग्णासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याची सुचना दिल्या जेणे करून ओ पी डी चालू झाल्यास सर्व सामान्य व लहान मुलांना लसीकरणाची सोय होईल व दुसऱ्या विभागात कोरोना बाधिताना वेगळे उपचार करता येईल.

वाळेकर साहेबाच्या सूचनेनुसार प्रसासक जगतसिंग गिरोसे साहेब व मुख्याधिकारी डॉ प्रशांत रसाळ साहेब यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनिअर राजेश तडवी व विशाल राठोड यांनी ओ पी डी साठी स्वतंत्र विभाग तयार केला असून मागील गेट मधून येण्या जाण्याची सोय करण्यात आली जेणे कोरोना आयसोलेशन विभागाकडून जाता येवु नये ,छाया रुग्णालयात ओपीडी व कोरोना आयसोलेशन स्वतंत्र विभाग तयार झाले असून लवकरच जनतेला त्याचा उपयोग घेता येईल.

शेत मालाला पुण्यात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्राध्यापकाचा प्रयत्न !
बुलढाणा जिल्यात ७ जुलै ते २१ जुलै पर्यंत लॉक डाऊन पालकमंत्र्यांची घोषणा



Comments (0)
Add Comment