पालम,प्रतिनिधी – पालम तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही ,पण पालम येथील बँक ,महसुल विभाग, कृषीविभाग,ग्रामीण रुग्णालय,बांधकाम विभाग ,व सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी बाहेरगावाहून अपडाऊन करतात म्हणजे, परभणी, नांदेड, गंगाखेड, लोहा ,परळी , इत्यादी शहरांमधून येणारे अधिकारी व कर्मचारी बाहेरून कोरोना आजार घेऊन येतील की काय अशी भीती पालम येथील सर्व नागरिकांमध्ये पसरली आहे.
परभणी ,नांदेड ,व गंगाखेड या शहरात कोरोना पाजिटिव्ह असणाऱ्याची संख्या दररोज वाढत चाललेली आहे यामध्ये एखाद्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना कोरोना संसर्गजन्य आजार झाला तर पालम व परिसरात कोरोना आजार पसरण्यास वेळ लागणार नाही, तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहिल्यास जनतेची प्रलंबीत असलेले कामे सुध्दा वेळेवर होतील, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अप-डाऊन न करता मुख्यालयी राहणे योग्य ठरेल असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालम येथील अपडाऊन करणारे अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे अशी मागणी मी माननिय मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे साहेब यांच्या कडे मेल द्वारे केली होती,त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातुन प्रत्युउत्तरादाखल मला मेल आला , पुढील कार्यवाहीसाठी मा.जिल्हाधिकारी परभणी यांना कळवले आहे, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्यासाठी सुचना मिळेल अशी अपेक्षा आहे.
रामप्रसाद कदम
महासचिव,परभणी जिल्हा युवक काग्रेस.
परळी शहरामध्ये संचारबंदी आदेश 14 जुलै 2020 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत कायम
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});