उल्हासनगरमध्ये कॉंग्रेसतर्फे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

उल्हासनगर,दि 24 (प्रतिनिधी)ः
ब्लॉक काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार उल्हासगर शहराच्या प्रभारी राणी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर शहर जिल्हा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कोविड रुग्णांसाठी फळ व मास्क वाटप करण्यात आले. तसेच उल्हासनगर शांतीनगर येथिल प्लॅटिनम कोविड रुग्णालयाच्या बाहेर उल्हासनगर शहर जिल्हा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष रोहित साळवे, साऊथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके , प्रदेश सेवादल सचिव मुन्ना श्रीवास्तव, अनिल बदाडे यांच्या मार्फत डॉ. कवीशा सिंग व उल्हासनगर महापालिकेचे अग्निशमन अधिकारी बाळू नेटके यांच्या हस्ते रुग्णाकरिता फळ वाटप करण्यात आले. तसेच उल्हासनगर कॅंप 4 येथिल शासकिय महिला कोविड रुग्णालयातील रुग्णाकरिता ब्लॉक काँग्रेसच्या गटनेत्या तथा सभापती अंजलीताई साळवे , जिल्हा महासचिव नयना मनवर , विजया गाडे यांच्या मार्फत डॉ भावना तेलंगे, डॉ योगिनी धडके यांच्याकडे फळे देण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे उल्हासनगर कॅंप 5 येथिल तहसील क्वारंटाईन केंद्रात अनुसूचित विभाग अध्यक्ष दीपक सोनावणे, महासचिव महादेव शेलार, अख्तर खान व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. उज्वला यांच्या कडे फळ देण्यात आले आहेत. सोबत शहरातील काही मोजक्याच पत्रकारांना व नागरिकांना N 95 च्या मास्कचे वितरण करण्यात आले, सर्व ठिकाणी सदर कार्यक्रम संपल्यावर नेहरू चौक येथील कार्यालयात स्व. राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेस काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडुन पुष्प हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली .

Comments (0)
Add Comment