औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री यांची पोकरा कामाची पाहणी 

वैजापूर, प्रतिनिधी – वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव येथे सकाळी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला यामध्ये कृषी विभागा अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधून झालेल्या कामाचा आढावा घेतला व शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन  झालेल्या कामांची पाहणी केली यामध्ये लक्ष्मण भांडे यांचे फळबाग लागवड मोसंबी, मोहन भांडे शेततळे अस्तरीकरणसह, सोनुबाई खैरनार व नवनाथ साळुंके यांचे शेततळे ,रंजना गंगाधर चोभे यांचे गांडूळ खत युनिट प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली .

यावेळी गंगाधर चोभे यांच्या शेतावर नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या शेतकरी शेतीशाळेला भेट देऊन मार्गदर्शन केले व झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले व जास्तीत जास्त शेतकरी यांनी लाभ घ्यावा असे सांगितले. व महालगांव  येथे ही पालकमंत्री यांनी भेट देवुन गटामार्फत बांनावर खतवाटपाटपाचा झिरवा झेंडा दाखवुन शुभारंभ, सामुहीक शेततळे, कांदाचाळ, शेतीशाळा आशा कृषी अंतर्गत झालेल्या कामाची पहाणी केली.

यावेळी  जिल्हाधिकारी उदय चौधरी,आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार ,उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख ,उपविभागीय अधिकारी संदिपान सानप,तहसीलदार निखिल धुळधर ,विरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील,तालुका कृषी अधिकारी अनिल कुलकर्णी,   दिपक कुचेकर कृषी सहाय्यक ,आदेश गायकवाड कृषि सहाय्यक  ,गावचे सरपंच ,उपसरपंच , तसेच बहुसंख्य महिला शेतकरी उपस्थित होते .

आज मनमाड येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

aurangabadvaijapur
Comments (0)
Add Comment