कंधारमध्ये ११ जणांना लागण; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंधार शंभर टक्के बंद

कंधार – सुरुवातीचे तीन महिने कंधार कोरोना पासून मुक्त होते. परंतु आता कोरोनाने शहर व परिसरात शिरकाव केल्या मुळे मागच्या १५ दिवसात ११ जणांना कोरोनाची लागण झाली. हा आकडा मोठा होऊनये म्हणून नगरपरिषदेने तात्काळ बैठक घेऊन जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला नागरिकांचे सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यास वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोनाने उशिरा का होईना कंधारवर कोरोना प्रादुर्भाव दाखवण्यात सुरुवात केल्याने नगरपरिषदेने जनता कर्फ्यू निर्णय घेतला आणि उत्कृष्टपणे तीन दिवस शंभरटक्के बंद पाळला. नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाने दिलेल्या पालन करणे गरजेचे आहे.

देशभर कोरोनाने हाहाकार उडवून दिला आहे. अनेक ठिकाणी उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे. सरकार, आरोग्य विभाग सतर्क असूनही कोरोनाचा फैलाव थांबवण्यात यश येत नाही. पाच लॉकडाऊन संपल्यानंतर दुसरे अनलॉक सुरू आहे. व्यवसाय, व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी कोरोनाची भीती मात्र कायम आहे. कामधंदे केल्याशिवाय पर्याय नसल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे नगरपरिषदेने नागरिकांच्या भल्या साठी जनता कर्फ्यू लावला पण ही सुटच नागरिकांच्या मुळावर येत असल्याचे चित्र आहे. गेली तीन महिने अलिप्त असलेल्या कंधारला आता कोरोनाची लागण होत आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत आहे. आता ग्रामीण भागातही या विषाणूने आपली पकड घट्ट करायला सुरुवात केली आहे. कंधार तालुक्यातील चिखलभोसी, सोनमाळतांडा, मोहिजा, यासह शहरात कोरोनाने यापूर्वी एन्ट्री केली होती. शुक्रवारी मोहजा येथे तीन आणि उस्माननगर येथे एकाला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून आता पर्यंत ११ जण या भयानक रोगाच्या कचाट्यात सापडले आहेत. कोरोनाचा पादुर्भाव झपाट्याने होत असल्याने शहर व परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आणि जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला या कर्फ्यूला जनतेनी व्यावसायिक छोट्या व्यापारी हातावर पोट असणारे मंजूर या जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होऊन तिन दिवस शंभरटक्के बंद पाळण्यात आला.

नांदेड व लोहा येथील डॉक्टरच्या संपर्कात आल्याने कंधार शहरात व तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. कंधार शहरात -एक, ग्रामीण भागातील चिखलभोसी -चार, सोनमाळ तांडा-एक, मोहिजा-एक असे सात जण कोरोना बाधित होते. यात शुक्रवारी (ता.तीन) चारणे भर पडली. मोहिजा- तीन आणि उस्माननगर- एक अशा चार रुग्णाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. तीन महिने अलिप्त असलेल्या कंधारमध्ये तीन महिन्यानंतर ११ जणांना कोरोनाची बाधा झाली. रुग्णांच्या संख्येत वरचेवर वाढ होत असल्याने नगरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शुक्रवारी पाठवण्यात आलेल्या७ जनांच्या स्वाब नमुन्याच्या अहवालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

वनामकृविचा सुरक्षा यंत्रणेवर लाखोंचा खर्च; महागड्या कंपनीसोबत अर्थपूर्ण व्यवहार
शेत मालाला पुण्यात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्राध्यापकाचा प्रयत्न !
बुलढाणा जिल्यात ७ जुलै ते २१ जुलै पर्यंत लॉक डाऊन पालकमंत्र्यांची घोषणा



Comments (0)
Add Comment