कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आळंदी शहरात लाॅकडाऊनची मागणी

नगरसेवक सचिन गिलबिले आणि आळंदी विकास युवा मंचाची मागणी
आळंदी देवाची : खेड तालुक्यातील कोरोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून या आता पर्यंत महिनाभरात तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या शंभराच्या पुढे गेली आहे या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन आळंदी शहरात सुध्दा काही पोलिस अधिकारी,कर्मचारी आणि नागरीक यांना कोरोना झाल्याने रुग्णांचे प्रमाण वाढत असून आळंदी शहरात काही दिवसांपूर्वी एक महिला कोरोणा मुळे मृत झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरात पुन्हा एकदा आठ दिवस लोकडाऊन करण्यात यावे अशी मागणी आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन गिलबिले आणि आळंदी विकास युवा मंच यांनी निवेदनामार्फत आळंदी नगरपरिषदला केली आहे.

आळंदी शहरातील आसपासच्या गावातील नागरिकांचा वावर वाढला असून यावर सुध्दा प्रशासनाने प्रतिबंध घातला पाहिजे, शासनाने दिलेल्या वेळेतच दुकाने उघडली आणि बंद केली पाहिजे यावर प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे.
या संदर्भात मुख्याधिकारी समिर भुमकर यांनी सांगितले की सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठवले जाईल त्यांनी परवानगी दिली तर लाॅकडाऊन संदर्भात विचार होऊ शकतो, स्थानिक प्रशासनाला लाॅगडाऊन जाहीर करण्याचा अधिकार नाही असेही त्यांनी सांगितले.

read this – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?
धक्कादायक… मेथी समजून करून खाल्ली गांजाची भाजी आणि मग…



Comments (0)
Add Comment