दुचाकीस्वारांकडुन अवाच्या सव्वा दंड वसुलीला सेलूकरांचा विरोध

सेलू – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जिल्हाधिकारी यांनी लाँकडाऊन जाहिर केले आहे. परंतु खरिप हंगामाची पेरणी तोंडावर आल्याने क्रषि निविष्ठा, अत्यावश्यक व जीवानावश्यक वस्तुंच्या दुकानांना सुट देण्यात आली असुन ग्रामीण भागातील शेतकरी बांधव सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने शेतकरी बी बीयाणे खरेदीसाठी दुचाकीवर येत आहे. परंतु पोलीस प्रशासन या शेतकऱ्यांच्या दुचाकीवर कारवाईचा बडगा उघारत मनमानी पध्दतीने अव्वाच्या सव्वा दंड वसूल करत असून शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची लूट होत असुन ही अन्यायकारक कारवाई तात्काळ थांबवावी अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी व जिल्हापोलिस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे राज्यउपाध्यक्ष छगन शेरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजित गजमल, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर,बाजर समितीचे माजी सभापती रविंद्र डासाळकर, माजी नगरसेवक मिलिंद सावंत, पाडुरंग कावळे, रघुनाथ बागल,विनोद तरटे,पप्पु शिंदे आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Comments (0)
Add Comment