नांदगाव नगरपरिषद नांदगाव तर्फे P1 व P 2 यापध्‍दतीने शहरातील बाजार व व्‍यापारी अस्‍थापना सुरळीत सुरु

नांदगाव – नांदगाव नगरपरिषद नांदगाव तर्फे P1 व P 2 यापध्‍दतीने शहरातील बाजार व व्‍यापारी अस्‍थापना सुरळीत सुरु ठेेवण्‍यासाठी नगरपरिषद अधिकारी कर्मचारी याचा एक गट गठीत करणेत आला आहे.

तसेेच शहरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांच्‍या एका जबाबदारी दिलेली असुन या अधिकारी कर्मचारी यांचे कडुन विना मास्‍क फीरण्‍या-या व सोशल डिस्‍टन्‍स न ठेवण्‍या-या नागरीकांवर दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात येत आहे. शहरात दिनांक ११/ ०६/२०२० रोजी विनामास्‍क फीरण्‍या-या नागरीकाकडुन रुपये ८००/- इतका दंड वसुल केला आहे. तसेच नांदगाव शहरात व्‍यापारी आस्‍थापणाांनी P1 व P 2 या नियमाचेे पालन न करणा-या ४- ५ व्‍यक्‍तींवर नांदगाव पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. या कार्यवाहीसाठी नांदगाव नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी डॉ.श्रीया स्‍वप्निल देवचके याचे मार्गदर्शनाखाली आतिष वालतुले, निलेश सपकाळे, राजु गरुड, बी.बी. शिंदे, वाल्मिक गोसावी, पवन चव्‍हाण, उमेश चंडाले, इत्‍यादी अधिकारी कर्मचारी काम करत आहे.

अशी करा सोयाबीन पिकाची लागवड

संत तुकाराम महाराज यांचे प्रस्थान सोहळा मर्यादित वारकर्‍यांच्या उपस्थित संपन्न



Comments (0)
Add Comment