पूर्णा – पूर्णा नगर परिषद पूर्णा येथे दोन वर्षापूर्वी मुख्य अधिकारी म्हणून पंकज पाटील हे रुजू झाले होते त्यांनी साधारणतः पाच ते सहा महिने पूर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले मात्र काही कारणास्तव ते सुट्टीवर गेल्यामुळे नगरपरिषद पूर्णा येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नव्हते कमीत कमी दीड वर्षापासून प्रभारी मुख्य अधिकारी यांच्या वर नगरपरिषदेचा कारभार चालत होता त्यामुळे नागरिकांच्या समस्या व कामे होण्यासाठी अडथळा येत होता मात्र आता पुन्हा पंकज पाटील मुख्याधिकारी म्हणून नगर परिषद पूर्णा येथे रुजू झाले ते एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जातात त्यांनी नगर परिषदेचा कारभार हाती घेतल्यामुळे आता नागरिकांच्या समस्या व कामे लवकर होतील अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकावयास मिळत आहे.