भार्डी येथे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा कृषी दौरा संपन्न

नांदगाव, प्रतिनिधी –  नादगाव येथे राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत देविदास मार्कंड यांच्या निवासस्थानी कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी प्रगतशील शेतकरी राणुबा मार्कड यांच्या आद्रक वाल स्विटकाॅन मका तसेच मुग पिकाची पहाणी करण्यात आली.

यावेळी देविदास मार्कड यांनी पारंपारीक शेती न करता बहुपिक पद्धतीने शेती केली तर काय फायदे होतात या विषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक पडवळकर, मालेगाव उपविभागीय अधिकारी देवरे, तालुका कृषी अधिकारी पाटील नागरे, माऊली कृषी सहायक मगर मॅडम, गणेश जाधव, महेंद्र दुकळे, सभापती किशोर लहाने, राजाभाऊ खेमणार, किरण देवरे, गुलाब भाबड, भार्डीचे माजीसरपंच विक्रम मार्कड, भाऊसाहेब मार्कड, सरपंच मनिषा मार्कड, देविदास मार्कड, दत्तु नाईकवाडे, हरिभाऊ नाईकवाडे, आनंदा मार्कड, चंद्रभान कदम, योगेश कदम, पोलीस पाटील, भाऊसाहेब मार्कड, दादाभाऊ नाईकवाडे, भास्कर नाईकवाडे, बाजीराव कदम ,बापु मार्कड, बबन मार्कड, विजय मारकड, श्रावण मार्कड, सुनिल कोल्हे, भाऊसाहेब व्हडगर, संजय मार्कड, अर्जुन मार्कड, सुभाष पगारे, प्रकाश पवार, साहेबराव आहिरे, रविंद्र सरोदे, रमेश सरोदे, दतु मार्कड, प्रभाकर वाघमोडे यांच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कृषी विभागाच्या वतीने ऑनलाईन सिंगल फेज ॲप्लीकेशन ही योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले असून या पुढच्या कालावधीत शेतकरी बांधवांना घरी बसल्या ऑनलाईन कृषी विभागात कोण कोणत्या योजनेत सहभाग घ्यायचा आहे. त्याची नोंदणी शेतकरी बांधवांना करता येईल एकदा नोंदणी केल्यानंतर पुन्हा नोंदणी करायची आवश्यकता नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा शेतकरी बांधवांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

दादा भुसे कृषी मंत्री व माजी सैनिक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य

विवाह सोहळ्यासाठी आता फक्त दहा लोकांची परवानगी; त्यासाठी असणार आहेत या अटी

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

manmadnashik
Comments (0)
Add Comment