लॉकडाऊन काळातही माजलगांवात मटका खुलेआम सुरू

माजलगांव,प्रतिनिधी:-मागील चार महिन्यापासून लॉकडाऊन चा कालावधी सुरू असून प्रशासनासह पोलीस प्रशासन एकीकडे कोरोनाशी दोन हात करीत असताना माजलगाव शहरात मात्र अवैध धंद्यापैकी एक असलेला मटका हा जुगार खुलेआम सुरू असून पेशांच्या अपेक्षेने सर्वसामान्य लोक जुगाराच्या नादी लागत असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत तर माजलगांव पोलिसांचे मात्र याकडे का कानाडोळा करीत आहे ? या बाबत नागरिक शंका उपस्थित करीत आहेत.

 

कोरोना काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्याने कुठून तरी पैसा मिळविण्याच्या नादात अनेकजण मटका या जुगाराच्या नदी लागत आहेत त्यात शहरात अनेक ठिकाणी खुलेआम मटका सुरू असल्याने पोलिसांच्या आशीर्वादा शिवाय हा जुगार चालूच शकत नाही असा आरोप नागरिक करीत आहेत.

 

दुसरीकडे या मटक्यापाई अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून कोरोनाच्या संकटाचे येथील मटका किंग लोकांनी संधीत रूपांतर केल्याचे एकंदरीत दिसून येत आहे तसेच अनेक नवीन मटका किंग माजलगांवात उदयास आले असून यांचे पोलिसांशी थेट संबंध असल्याचेही बोलल्या जात असल्याने येथील पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

तर दुसरीकडे ज्याठिकाणी मटका खेळला जातो त्या ठिकाणी लोक सदोदित एकत्र जमा झालेले पहावयास मिळतात त्यांच्या तोंडावर ना मास्क असतो ना सामाजिक अंतर त्यामुळे आजच्या परिस्थितीत कोरोनाचा सामाजिक फैलाव होण्याचा देखील धोका निर्माण झाला आहे.

 

महावितरणच्या भरतीचा परीक्षार्थींना Shock : भाग-१

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

Comments (0)
Add Comment