सुरक्षा समितीला करावा लागतो आडमुठ लोकांचा सामना, पोलिसी दंडुकाच आणणार वटणीवर बाहेरून शहरात आलेल्यांना

माजलगांव, प्रतिनिधी – शहरात आलेल्या लोकांना कोरंटाईन अथवा होम कोरंटाइन करण्यासाठी माजलगांवात सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु या सुरक्षा समितीला तपासणीदरम्यान आडमुठ लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे बाहेरून आलेल्या अश्या आडमुठ लोकांपासून महामारीचा धोका रोखण्यासाठी पोलीस दंडुक्याची गरज पडणार आहे.

मोठ्या प्रमाणात परराज्यातून जिल्ह्यातून लोक माजलगांव शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरावर कोरोना पसरण्याच्या भीतीची छाया गडद झाली आहे.शहरात आलेल्या या लोकांना शोधण्यासाठी माजलगांव नगर परिषदेने सुरक्षा समितीची स्थापना केली आहे. या समितीत त्या त्या वार्डाचे नगरसेवक दोन सुरक्षारक्षक व पालिकेचे दोन दोन कर्मचारी आहेत. सुरक्षा समिती ज्यावेळेस शोध घेऊन संशयिताच्या घरी जाऊन त्याला कोरंटाईन अथवा होम कोरंटाईन होण्याचा सल्ला देते त्यावेळेस सुरक्षा समितीला त्यासंबंधित बाहेरून शहरात आलेल्या व्यक्तीकडून अथवा त्याच्या कुटुंबाकडून आडमुठेपणाचा सामना करावा लागत आहे. शहरात दाखल झालेल्या लोकांनी स्वतःहून मेडिकल तपासणी करणे आवश्यक आहे अथवा घरात थांबून सामाजिक आंतर राखणे गरजेचे आहे.परंतु बरेचसे लोक सर्रासपणे बाहेर फिरून महामारीचा धोका वाढवत आहेत. त्यामुळे अशा आडमुठ लोकांची पोलिसांना माहिती देण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी केले असून महामारी पसरविण्याचा धोका वाढवणाऱ्या अश्या बाहेरून आलेल्या आडमुठा लोकांना पोलीसी दंडुकाच वट नीवर आणणार असल्याचे दिसून येत आहे.

Comments (0)
Add Comment