प्रा. नारायण सिरसाठ यांचे सामाजिक भान…..!
अंबाजोगाई, प्रतिनिधी – सध्या कोरोनाच्या जागतिक महासंकटाने सर्वत्र भितीच वातावरण तयार झालं आहे.त्यामुळे देशातील व राज्यातील सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झालेला दिसत आहे. आणि येत्या काळात परिस्थिती आणखी बिघडेल याची शक्यता देखील नाकारता येत नाही.इतर क्षेत्रांप्रमाणे अतिशय महत्वाच्या शिक्षण क्षेत्रावर देखील कोरोनाचा मोठा प्रभाव झाला आहे.सर्व शाळा,महाविद्यालये आणि खाजगी शिकवणी अमर्यादित काळांसाठी बंद राहतील अस स्पष्ट चित्र दिसत आहे..पण आयुष्याच्या नेमक्या महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेल्या दहावीच्या विध्यार्थ्यांना कोरोनासोबतच अभ्यासाची भीती भेडसावत आहे.कारण पूर्वीच्या परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत दहावीच्या विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून सर्व विषयांची ओळख आणि दहावीचा अभ्यास कसा करावा याच मार्गदर्शन उन्हाळी बॅचेस मधून मिळालं असत पण तसं झालं नाही परिणामी विध्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत.याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकी जोपासत अंबाजोगाई येथील संकल्प मॅथ्स क्लासेस चे संचालक प्रा. नारायण सिरसाठ यांनी अंबाजोगाई परिसरातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन मॅथ्स क्लासेसचे आयोजन केले आहे.
याबाबतीत अधिक माहिती अशी की अंबाजोगाई येथील संकल्प क्लासेसच्या वतीने नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने नवनवीन प्रयोगशील उपक्रम राबविले जातात.सध्या संबंध जगामध्ये कोरोनाने थैमान घातले असुन भारतात व महाराष्ट्र राज्यातही कोरोना चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात जाणवत आहे. पूर्ण देश लॉकडाऊन असुन या पार्श्वभूमीवर इतर क्षेत्रांप्रमाणे अतिशय महत्वाच्या शिक्षण क्षेत्रावर देखील कोरोनाचा मोठा प्रभाव झाला आहे.सर्व शाळा,महाविद्यालये आणि खाजगी शिकवणी अमर्यादित काळांसाठी बंद राहतील अस स्पष्ट चित्र दिसत आहे.या कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमा वरती परिणाम होऊ नये म्हणून खास पालकांच्या आग्रहास्तव आणि विध्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत येथील संकल्प क्लासेसचे संचालक प्रा नारायण सिरसाठ यांनी संकल्प मॅथस क्लासेसच्या वतीने परिसरातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “मोफत ऑनलाइन क्लास” हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती दिली.यामध्ये विध्यार्थ्यांना बीजगणित(algebra) आणि भूमिती(geometry) या विषयांचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सोबतच ऑनलाइन परीक्षा देखील घेण्यात येणार आहेत.तरी या पूर्णपणे मोफत असणाऱ्या ऑनलाइन क्लासचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संकल्प मॅथस क्लासेसचे संचालक प्रा.नारायण सिरसाट यांनी केले असुन या क्लासेसमध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8055512888,7972183619 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन संकल्प क्लासेसच्या व्यवस्थापनाने केले आहे.