अकोट,दि 22 ः रोजी सुधारणा लोकराज्य दल तर्फे दर्यापूर रोडस्थित अवधुत कॉलनी येथे रस्ता आणि नाल्या नसल्यामुळे नागरिक त्रस्त असून पायी चालणे, वाहन चालविणे कठीण झाले आहे. अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिक जीव मुठीत घेऊन जात आहेत. तीन वेळा रस्त्याचे मोजमाप करण्यात आले परंतु प्रत्यक्ष काम करण्यास प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक टाळाटाळ करीत खोटी आश्वासने देऊन स्वतःला धन्य समजत आहेत.
अखेर सुधारणा लोकराज्य दल म्हणजे सुलोद प्रमुख राहुल सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली अवधुत कॉलनी मधिल रहिवासी आज मुख्याधिकारी व नगराध्यक्ष ह्यांना भेटले व रस्ता व नाल्या करण्यासाठी उपाय योजना यावर सविस्तर चर्चा केली. लवकरात लवकर कामांना सुरूवात करण्याची ग्वाही मुख्याधिकारी व नगराध्यक्ष ह्यांनी दिली.
निवेदन देतेवेळी राहुल सपकाळ, किरण खंडारे, ॲड. नंदकिशोर शेळके, जयदेव नितोने, विजय तेलगोटे, भारत ठाकूर,अमोल डहाके, राजेंद्र हिरुळकर, शेषराव धांडे, प्रवीण कुळकर्णी, बंडुभाऊ तलोकार, गजानन धुराटे, प्रदिप नितोने, अमोल मानकर, मडावी,
नागापुरे, मोहन तेलगोटे, उमेश वानकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.