अघळ पघळ अन घाल गोंधळ !

वनामकृवितील वादग्रस्त कार्यपध्दतीचा पंचनामा : भाग-4
परभणी, प्रतिनिधी –
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मागील काही दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांकडून विद्यापीठातून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकाराचे अर्ज देण्यात आले आहे. या अर्जांना योग्य उत्तर देण्याऐवजी विद्यापीठाने एक प्रसिध्दी पत्रक काढून विषयांतर केल्याने अघळ पघळ अन् घाल गोंधळ अशी अवस्था वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची झाली आहे.

लोकसेवा मल्टिसर्व्हिसेस Lokseva Multiservices

मौजे बलसा, सायळा, खानापूर, शेंद्रा व परभणी विद्यापीठातंर्गत प्रकल्पग्रस्त नागरिक मोठया संख्येने माहितीच्या अधिकाराखाली त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीस विद्यापीठामध्ये नोकरीत सामावून घेतले आहे, त्यांचे किती क्षेत्र संपादीत केलेले आहे, इत्यादी बाबतीत माहितीची मागणी करीत आहेत. या अर्जांना विद्यापीठ प्रशासन त्रस्त झाले आहे. अतिशय साधी व सोपी माहिती विचारलेली असताना ती माहिती देण्यास विद्यापीठ टाळाटाळ करत आहे.
माहिती देण्याऐवजी वनामकृविचे कुलसचिव यांनी एक प्रसिध्दी पत्रक काढले आहेत. त्यात मौजे बलसा, सायळा, खानापूर, शेंद्रा व परभणी विद्यापीठातंर्गत प्रकल्पग्रस्त नागरिक मोठया संख्येने माहितीच्या अधिकाराखाली त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीस विद्यापीठामध्ये नोकरीत सामावून घेतले आहे, त्यांचे किती क्षेत्र संपादीत केलेले आहे, इत्यादी बाबतीत माहितीची मागणी करीत असल्याचं मत कुलसचिव पाटील यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केले असून विद्यापीठामध्ये अनेक व्यक्ती अनाश्यक चौकशी करीत असल्याचा आरोप ही पाटील यांनी केला.

 

विद्यापीठाने 2009 मध्ये प्रकल्पग्रस्तांकरिता शासनाच्या परवानगीने विशेष भरती प्रक्रिया राबवून पात्र उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. सदर भरती प्रक्रियेमध्ये काही उमेदवार अपात्र ठरले किंवा ज्यांना लेखी परीक्षेत कमी गुण प्राप्त झाले आहे, अशाना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना यापुर्वीच विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांसाठी नोकरीचा लाभ घेतलेला आहे. अशा प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठात सेवेत सामावून घेतलेले नाही, असे कुलसचिव पाटील यांनी म्हटले. भविष्यातही होणार्‍या पद भरतीत शासन निर्णयाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांकरिता नियमाप्रमाणे आरक्षण ठेवण्यात येईल व भरती प्रक्रिया पार पाडली जाईल. तरी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठ सेवेत सामावून घेण्याबाबत किंवा नोकरीबाबत वारंवार विचारणा करू नये. तसेच विद्यापीठ प्रशासन हे नियमानुसार प्रकल्पग्रस्तांकरिता कार्यवाही करीत आहे. अशी माहिती वनामकृवि कुलसचिव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

परंतु विद्यापीठात विचारण्यात आलेल्या माहिती अधिकारात कुठेही नोकरी लावण्याबाबत उल्लेख केलेला नव्हता. तसेच नोकरीची मागणीही केलेली नाही. त्यांना जी माहिती विचारली ती देण्यात आली नाही. आणि काही व्यक्तींद्वारे प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव रणजीत पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे. त्यामुळे विद्यापीठाची अवस्था अघळ न पघळ घाल गोंधळ अशीच झाल्याची प्रतिक्रिया प्रकल्पगस्तांनी शब्दराजशी बोलताना दिली आहे.

प्रकल्पग्रस्तांना आमिष दाखवणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
विद्यापीठाने प्रसिध्दी पत्रक काढून काही व्यक्ती प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले असून ज्या कोणी व्यक्ती असे आमिष दाखवत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. कारण विद्यापीठाने केलेल्या आरोपामुळे प्रकल्पग्रस्तांत भितीचे वातावरण आहे. एकाही प्रकल्पग्रस्ताची फसवणूक होवू नये यासाठी जर विद्यापीठाला अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल करणे शक्य नसेल तर अशा व्यक्तींची माहिती त्यांनी प्रकल्पग्रस्तांना द्यावी. आम्ही स्वतः अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करूत अशा मागणीचे निवेदन प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठाला दिले आहे.

part 1 : वनामकृविचा सुरक्षा यंत्रणेवर लाखोंचा खर्च; महागड्या कंपनीसोबत अर्थपूर्ण व्यवहार
part 2 : स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?
part 3 : अबब… वनामकृविचे सोयाबीन बियाणे नापास, शेतकर्‍यांची फसवणूक



vnmkv news part 4वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
Comments (1)
Add Comment