पुणे तसेच अहमदनगर येथील नामांकित ‘दैनिक युवा ध्येय उद्योग’समूहाकडून संपूर्ण महाराष्ट्रातून समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवराना गौरविण्यात येते. यावेळी मराठा बिजनेस कम्युनिटीचे संस्थापक अजय मराठे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
अजय मराठे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच मराठा बिजनेस कम्युनिटी या माध्यमातून मराठा समाजातील विविध समाजबांधव व व्यावसायिक युवकांचे मोठ्या प्रमाणावर संघटन उभारून त्यांना एका छताखाली आणण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे शाळामध्ये शिवजयंती साजरी करण्यात यावी, महिलांकरीता प्रत्येक हाताला काम व कांदाप्रश्न, तसेच झोपडपट्टी विभागामधील गरीब कुटुंबांना कपडे, ब्लॉकेट, शालेय विद्यार्थ्यांना चप्पल-बूट, गणवेश वाटप इत्यादी अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहे. त्यांना जाहीर झालेला हा पुरस्कार त्यांच्या कामाची पावतीच आहे.
त्यांना या अगोदर एकवीस पुरस्कार मिळालेले असून त्यामध्ये दोन राष्ट्रीय, नऊ राज्यस्तरीय व दहा जिल्हास्तरीय आहेत. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबाबत त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष कौतुक होत आहे.