अतिवृष्टीग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यापेक्षा आर्थिक मदतच द्यावी – मा.गटनेते एकनाथ पवार

नांदेड, माधव पांचाळ – लोहा कंधार विधानसभा मतदार संघात मागील दोन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी मन्याड फाऊंडेशनचे अध्यक्ष एकनाथ पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे.

परतीच्या मान्सूनने मागील दोन दिवसापासून लोहा कंधार विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन खरिपाच्या कापूस,सोयाबीन, ज्वारी, मूग उडीद , सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मा.गटनेते एकनाथ पवार यांनी लोहा कंधार मतदार संघातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करत बसण्यापेक्षा थेट मदत देण्यासाठी याकरिता जिल्हा प्रशासनाला विनंती केली आहे…

अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी नदीनाल्यांचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी महामार्गावरील वाहतूक सुद्धा ठप्प झाली तर अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे,एकंदरीत परतीच्या मान्सूनने हाहाकार उडवला असल्याचे चित्र विधानसभा क्षेत्रात पाहावयास मिळत आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यावर दरवर्षी अनेक संकटे ओढवत आहेत.शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लोहा कंधार चे भूमिपुत्र एकनाथ पवार हे सातत्याने कार्य करत असून या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे एकनाथ पवार यांनी स्पष्ट केले.

मागील दोन दिवसापासून होत असलेल्या पावसाने थैमान घातले असून यामुळे हजारो हेक्टर वरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी नदीनाल्यांचे पाणी शेतात घुसल्याने जमिनीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. याबाबत एकनाथ पवार यांनी लोहा-कंधार तहसीलदार व नांदेड जिल्हाधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी तसेच संबंधित तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे करण्यापेक्षा तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत विनंती केली आहे.

Comments (0)
Add Comment