मानवत – पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित फार्मसी महाविद्यालयामार्फत आज मानवत शहरात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व घटकांना मोफत सॅनिटीझर वाटपाच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या अंतर्गत पोलीस स्टेशन, महसूल विभाग, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका स्वच्छता कर्मचारी, भाजीपाला व फळे विक्रेते, किराणा दुकानदार, हॉस्पिटल्स, आरोग्य कर्मचारी यांना मोफत सॅनिटीझर व मास्क वाटप करण्यास सुरवात करण्यात आली असून,सर्वाना वाटप केले जाणार असून आज प्रातिनिधिक सुरवात मानवत तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे वाटप करून करण्यात आली.
सदरील मोहिमेस संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, सचिव बालकिशनजी चांडक, व संस्थेचे सर्व पदाधिकार्यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वजण सर्व शासकीय नियमाचे पालन करून अभियान यशस्वीरीत्या राबवत आहेत.