अनलॉक असतानाही सोलापूरकरांनी नियम पाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये तरच कोरोनाचे संक्रमण कमी होईल – पालकमंञी ना. भरणे

सोलापूर – ११जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन पालकमंञी ना.दत्ताञय भरणे यांच्या ऊपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी मागील वर्षाच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात मृत्यूदर कमी आहे .

कोरोना नसताना गतवर्षी मृत्यू संख्या अधिक होती. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. अनलॉक असतानाही सोलापूरकरांनी नियम पाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये तरच कोरोनाचे संक्रमण कमी होईल असे आवाहन पालकमंञी ना. भरणे यांनी केले.

येत्या दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव 80 टक्के वाढेल अशी भीती वैशंपायन डॉ. संजीव ठाकूर यांनी व्यक्त केली. ही भीती रास्तच आहे. नागरिकांनी अनलॉक मध्ये नियम न पाळल्यास कोरोनाचा विळखा वाढू शकतो. जर नियम पाळल्यास कोरोनाचे संक्रमण कमी होईल.

तत्पुर्वी बचत गट, फायनान्स, मायक्रो फायनान्स तसेच वित्तीय संस्थेच्या मार्फत कोणत्याही प्रकारची कर्ज हप्ते वसुली केल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. सोलापूर शहर व जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांनी तसेच विविध कारणांसाठी नागरिकांनी कर्ज घेतले आहे.

मात्र लॉकडाऊनच्या काळात सक्तीने कर्जाच्या हप्त्याची वसुली करणे तातडीने थांबवावे याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेत. सध्या लॉकडाऊन मध्ये घर मालकांनी भाड्यासाठी तगादा लावू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घर भाडे वसूल करावे.

विनाकारण भाडेकरूंना त्रास देऊ नये, भाडे वसुलीसाठी तगादा लावू नये यासाठी ही संबंधित विषयावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले.

दारू विक्री करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन लवकरच निर्णय घेणार आहे, होम डिलिव्हरी दारू विक्री सुरू केल्यास नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. खाजगी रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना आपल्या रुग्णालयात संलग्न करून घ्यावे. नॉन कोव्हीड पेशंटकडून खाजगी रुग्णालयांनी पीपीई किटसाठी पैसे घेऊ नये.

वीज बिलासाठी कनेक्शन कट करू नये. नागरिकांनी नियम पाळावे, सोशल डिस्टन्स मेंटेन करावे, मास्क लावावेत, विनाकारण घराबाहेर पडू नये, घाबरून न जाता धीराने सामना करून आपण कोरोनाला हरवू असा विश्वास पालकमंञी ना.भरणे यांनी समस्त सोलापूर वासीयांना दिला,

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त पी . शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, ग्रामीण पोलीसचे अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संजीव पाटील, वैशंपायन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आदी उपस्थित होते.

पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील रुग्‍णांसाठी समर्पित कोविड आरोग्य केंद्र

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

solapur
Comments (0)
Add Comment