आळंदी देवाची : आळंदी देवाची येथील इंद्रायणी नदी काठावर असणारे गोर गरीब भिक्षेकरी, अपंग व्यक्ती, बांधकाम मजूर यांना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संदर्भात दक्षता आणि आरोग्याची काळजी घेतली जावी म्हणून पतसंस्थचे चेअरमन मनोज कुऱ्हाडे आणि व्हाईस चेअरमन सुजीत काशीद यांच्या वतीने मास्क चे वाटप करण्यात आले.
स्वच्छतेची सवय लागावी याकरिता मोफत मास्क वाटप करण्यात आले. तसेच या काळात काय करावे आणि काय करू नये अशी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली, नागरिकांनी घाबरून न जाता यावेळी जागरूक व सजग राहण्याची गरज आहे असे पतसंस्थचे चेअरमन मनोज कुऱ्हाडे यांनी मत मांडले. नदी परिसरातील गरजूंना मास्क चे मोफत वाटप करून पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अलंकापुरी निधी पतसंस्थचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.