अवाजवी विद्युत बिलाने नागरिक त्रस्त : महावितरणने नागरिकांना दिले वाढीव विद्युत वीज बिल चे करंट

नेरी : नागरिकांनी संचारबंदीत सरासरी वीज देयके भरूनही मोठ्या प्रमाणात विजेची बिलं महावितरणकडून नागरिकांना पाठविण्यात आल्याने नागरिकांत महावितरण प्रति रोष निर्माण झालेला आहे. लॉकडाऊनमुळे हातात काम नाही, व काम नसल्याने हातात खर्च करण्यासाठी पैसे नसताना हजारोंच्या घरात वीज बिलं आल्याने ते भरायचे कसे असा गहन प्रश्न नागरिकांत पडलेला आहे.

कोरोनामुळे सामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असताना मात्र नागरिकांना आता महावितरणने वाढीव वीज बिलांचा करंट दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सरासरी वीज बिल देणाऱ्या महावितरणने ग्राहकांना अचानक भरमसाट बिल पाठवलं आहे.

मात्र यापूर्वी पाठविलेली सरासरी वीज देयके अनेक ग्राहकांनी भरली, तरीही महावितरणने त्यांना मोठ्या रकमेची वीज बिलं पाठवीली त्यामुळे नागरिकांत महावितरण बद्दल नाराजी पसरली आहे. कमी-अधिक फरकाने अनेक वीज ग्राहकाची वीज देयके अवाजवी असल्याने याची तात्काळ दखल घेऊन शासनाने नागरिकांचे वीज देयक माफ करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार सध्या जैसे थे…

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

nagpurneri
Comments (0)
Add Comment