हिंगणघाट ,प्रतिनिधी – कोरोनाचा पार्श्वभूमीवर अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले त्यातच इंग्लिश स्पिकिंग हा ट्रेनिग कोर्स ४ महिन्यापासून बंद आहे. करिता आज दि. ९ – जुलै रोज गुरवारला मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांचा मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील आम्ही इंग्लिश स्पिकिंग चे शिक्षक इंग्लिश स्पिकिंग हा कोर्स ३ महिन्याचा असतो आणि हा कोर्स आम्ही बऱ्याच वर्षांपासून घेत आलो आहे. हा ट्रेनिंग कोर्स असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्गात बसण्याची आसन क्षमता १० ते १५ विद्यार्थी बसू शकेल एवढी असते. आम्ही ज्या विद्यार्थाना शिकवतो त्यांचा कडून आम्हाला सराव करून घावा लागतो त्यामुळे आमचा हा कोर्स पूर्णपणे अशैक्षणिक क्षेत्रात मोडतो. हा ऐच्छिक कोर्स असल्यामुळे या कोर्ससाठी फार कमी विद्यार्थी उपलब्ध होतात.
राज्यात कोरोनाचा महामारीमुळे सतत लॉकडाऊन सुरु असल्यामुळे ४ महिन्यापासून हा कोर्स पूर्णतः बंद आहे हा कोर्स आमचा उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे उन्हाळ्याचा हंगामात एप्रिल ते जून महिन्यात शालेय सुट्ट्या असतात या हंगामाच्या सिजन मध्ये आम्ही वर्षभराचा खर्च भागवतो.
कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही सरकारने सूचित केलेल्या धोरणाचे पूर्णपणे पालन करत आलेलो आहे. कोरोनामुळे आमच्यावर व आमचा कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आमच्याकडे जगण्याकरिता दुसरे कोणतेच साधन नाही आहे ज्याप्रमाणे शासनाने कॅम्पूटर ट्रेनिंग कोर्स ला कोव्हिड मध्ये मान्यता दिली आहे त्याचप्रमाणे इंग्लिश स्पिकिंग कोर्स लाही मान्यता देण्यात यावी. शासनाने दिलेल्या शर्ती व अटीनुसार आम्ही सोशल डिस्टन्स आणि सानिटायझर चा वापर करून कोर्स घेऊ इच्छितो. तरी शासनाने आमचा विचार करावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना करीत आहोत.
यावेळी उपस्थित मनसे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश वांदिले सर, इंग्लिश स्पिकिंग चे इमरान सर, मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष अमोल बोरकर, सचिव सुनील भुते, वा.सेना जिल्हाध्यक्ष रमेश घंगारे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, विदयार्थी सेना जिल्हाध्यक्ष राहुल सोरटे उपस्थित होते.
” सुरगाणा” तालुक्याला निसर्गाने बहाल केली सुंदर निसर्ग सौंदर्य देणगी…
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});