आंबा महोत्सवाचे आयोजन

 

पुणे, प्रतिनिधी – शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत तसेच “ना नफा ना तोटा” या संकलेपनेतून ‘ओसवाल जैन आंबेवाले’ यांनी आंबा महोत्सवाचे आयोजन केले असून या महोत्सवाचे उद्घाटन पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुरुवार पेठ येथील श्री गोडी पार्श्वनाथ मंदिर ट्रस्ट येथे विजय भंडारी उपसंचालक जितो अॅपेक्स व ओमप्रकाश रांका अध्यक्ष जितो यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी राजमल ओसवाल, नगरसेवक अजय खेडेकर, प्रमोद ओसवाल, शैलेश ओसवाल, राजेश बोबरा आणि लच्छूभाई असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

विजय भंडारी म्हणाले, कि नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या केशरसह कोकणातील हापूस, देवगड, कर्नाटकी तसेच हैद्राबादी असे विविध आंब्याची चव ग्राहकांना चाखायला मिळणार आहे. ओमप्रकाश रांका म्हणाले, कि पुण्याच्या मध्यभागी ओसवाल जैन आंबवाले या तरुणांनी सुरु केलेला आंबा महोत्सव हा उपक्रम कौतुकास्पद असून पुण्याच्या मध्यभागी असलेल्या महोत्सवामुळे मध्यभागी राहणाऱ्या लोकांना या महोत्सवाचा लाभ घेता येणार आहे.

हा आंबा महोत्सव सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खुला ठेवण्यात येणार आहे. तसेच पुणेकरांना कोकणातील व इतर राज्यातील आंबे या ठिकाणी मिळणार आहेत. अशी माहिती प्रमोद ओसवाल “ओसवाल जैन आंबेवाले” यांनी दिली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मांगीलाल सोलंकी यांनी केले.

Comments (0)
Add Comment