परभणी,दि 23 (प्रतिनिधी)ः
आडगाव (रंजे) ता. वसमत, जि. हिंगोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण आयोजित करण्यात आले आहे.सरपंच सौ.विजया चव्हाण यांनी आरोग्य विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
आडगाव येथील ग्रामस्थांना लसीकरणासाठी हट्टा येथे जावे लागत आहे.हट्टा येथे अनेक गावे जोडली असल्याने भल्या मोठ्या रांगा असल्याने आडगाव ग्रामस्थांची हेळसांड सुरु होती.त्यामुळे आडगाव येथेच उपकेंद्रात किंवा जिल्हा परिषद शाळेत लसीकरण सुरु करावे अशी मागणी सरपंच सौ.विजया दिलीपराव चव्हाण यांनी तालुका आरोग्य अधिकारी वसमत यांच्याकडे निवेदनाद्वारे दि.11 मे रोजी केली होती.या निवेदनाची दखल घेत आरोग्य विभागाने आडगाव येथे लसीकरणासाठी मंजुरी दिली आहे.त्यानुसार सोमवारी 9दित.24) सकाळी 10 वाजता ज्या नागरीकांचे वय 45 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अशा नागरिकांकरिता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा डोस देण्यात येणार आहे.अशी माहीती सरपंच सौ. विजया दिलीपराव चव्हाण यांनी दिली आहे.