आधार कार्ड केंद्र चालू करण्यात यावे – शिवसेना ग्राहक कक्षाच्या वतीने निवेदन

मनमाड,प्रतिनिधी – सध्या संपूर्ण जगासह भारतात कोविड १९ कोरोना व्हायरस विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने लोकांच्या हितासाठी काही कठोर निर्णय घेत २२ मार्चपासून ३१ मे पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन ची घोषणा केली. यामध्ये संपूर्ण उद्योग, व्यवसाय, कार्यालये बंद करण्यात आली. हि उपाययोजना कोरोना विषाणूचा संसर्गजन्य थांबवण्यासाठी करण्यात आला.

जुन २०२० पासून शासनाने “मिशन बिगिन अगेन ” संकल्पनेद्वारे व्यवसायांना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसाय, उद्योग काही अटी व शर्तींवर सुरु केले. परंतु शासनाच्या अखत्यारीत येणारे आधार केंद्र आजपर्यंत सुरक्षेच्या कारणाने बंदच ठेवण्यात आले आहे. आधार केंद्रासारखे महत्वाचे कार्यालय बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आधार कार्ड प्रत्येक शासकीय कामांना अनिवार्य आहे.

विशेषकरून गर्भवती महिलांना रुग्णालयात नोंदणीसाठी, आयुष्मान भारत योजनेसाठी, महात्मा फुले आरोग्य योजनेसाठी, शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचे फॉर्मसाठी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी, व्यापाऱ्यांना आयकर विवरणपत्र भरण्यासाठी, उद्योग आधार ची नोंदणी करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत प्रवासासाठी ई पास बनविण्यासाठी आधारकार्ड अद्यावत असणे आवश्यक आहे.

तरी आम्ही आपणास या निवेदनाद्वारे विनंती करतो कि, विशेष अटी, शर्तीच्या आधारे संबंधित आधार केंद्र सुरु करण्यात यावे. यावेळेस शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष चे शहरप्रमुख योगेश इमले व कयाम सय्यद सचिन आव्हाड हेमंत देशमुख ज्ञानेश्वर धोंडगे आदी उपस्थित होते.

आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

manmadnashik
Comments (0)
Add Comment