आधार फाऊंडेशन च्या महिलांनी वटवृक्ष लावून साजरी केली वटसावित्री

 

हिंगणघाट (वर्धा),दि 24 (प्रतिनिधी)ः
आधार फाऊंडेशन महिला समिती च्या वतीने दरवर्षी वटवृक्ष लावून वटसावित्री साजरी केली जाते. यावर्षी स्थानिक संविधान चौक परिसरामध्ये वटवृक्षाचे रोपण श्रीमती स्मिता मुडे पशुधन विकास अधिकारी, श्रीमती सुमन पाटील संचालक ग्रामीण विकास संस्था हयाच्या हस्ते करण्यात आले .

वटवृक्ष लावणे ही काळाची गरज ओळखून हा उपक्रम राबविला जातो वडाला अक्षय वृक्ष म्हणतात या वृक्षाचा कधीच क्षय होत नाही तो सतत वाढत जातो वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा उगवतात त्यामुळे झाडाचा विस्तार होतो व त्यालाआयुष्य उदंड लाभते त्याच्या विशाल आकार व भरपूर पाने असल्याने तो अनेक विषारी वायू शोषून घेतो हवा शुद्ध ठेवतो त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सदापर्णी बहुवार्षिक वृक्ष म्हणजे वटवृक्ष होय. हा महाकाय वटवृक्ष थंड सर्वाधिक प्राणवायू देणारा असून त्याची साल व मूळ अतिशय गुणकारी समजली जात असल्यामुळे परंपरा व पर्यावरण यांची सांगड घालून वटवृक्ष रोपण व त्याचे संवर्धनाचे काम आधार फाऊंडेशन च्या महिला समितीने हाती घेतलं आहे मागील चार वर्षापासून हिंगणघाट शहरामध्ये विविध जातींच्या वृक्षाचे रोपण व वृक्षवाटप करून आज पावतो शेकडो वृक्षाचे रोपण व त्याचे संवर्धनाचे कार्य आधार फाउंडेशन कडून होत आहे या वटवृक्षरोपणाच्या कार्यक्रमाचे संचालन राजश्री विरुळकर हयानी तर आभार वैशाली लांजेवार हयानी मानले या वृक्षरोपणाच्या यशस्वी आयोजनाकरिता महिला समितीच्या माया चाफले ,माधुरी विहीरकर, वीरश्री मुडे ,डॉ.अनिता मनवर,स्वाती वांदीले,अनुराधा मोटवाणी,अनिता गुंडे, ज्योती धार्मिक,शुभांगिनी नायर,निलाक्षी बुरीले,ज्योती हेमने,प्रणिता तपासे,सुषमा पाटील,मनिषा नगरकर,रश्मी धायवटकर,शितल गिरीधर ,भाग्यश्री वांदीले, ज्योती कोहचाडे,संगीता ढगे,शालिनी डफ,शारदा डुंबरे आदींनी सहकार्य केले

Comments (0)
Add Comment