“सूर्याच्या प्रखरतेलाही
शिक्षणाने लाजवेन
एक दिस या विश्वाची
राणी मी होवून दाखवेन”
असा अचाट आत्मविश्वास असलेल्या नागपूर येथिल कवयित्री सौ दिशा बौध्दे उर्फ शालिनी चव्हाण यांचा ‘आर्त हाक’ हा काव्यसंग्रह नुक्ताच हाती पडला व तो वाचून त्याच्यातील कविता व कवयित्री विषयी दोन शब्द लिहावेसे वाटले.
आपल्या वैयक्तीक जीवनात आलेले व आपल्या भोवताली अनूभवलेले प्रत्यक्ष क्षण त्यांनी आपल्या शब्दात कैद करून मुक्तपणे आपल्या कवितेतून मांडलेले आहेत .आजच्या प्रगत काळातही स्त्रीयांवर होणारे अत्याचार पाहून त्यांचे कवीमन विषिन्न होते व स्त्रीयांचे दुःख शब्दबध्द करण्यासाठी त्यांची लेखणी कायमच सरसावलेली दिसते काही स्वतः भोगलेले काही भोवतातच्या जगातील प्रेम दुःख निसर्ग या विषयी त्यांनी आपल्या कवितांमधून सुंदर व प्रभावी शब्दात चित्रण केले आहे.
आयुष्याची वाटचाल करतांना माणसाला जगण्यासाठी प्रेम ही भावना महत्वाची भुमिका महत्वाची असते मग ते प्रेम कुणाचे ही असो आई वडील भाऊ बहीण प्रियकर किंवा पती आयुष्यात भरभरून प्रेम असलेतर जगण्याला खूप उभारी येत असते माणूस कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास तत्पर असतो अशाच काही आशयांची त्यांची ‘तू आहेस म्हणून’ या शिर्षकाची कविता खूप काही सांगून जाते
“माझे तरी काय आहे
तू आहेस म्हणून मला अर्थ आहे
प्रत्येक गोष्टीत आनंद आहे,
स्वप्नातील ध्येय आपल्याला गाठायचे आहे
स्वर्गात तरी एकट्याला कुठे जागा आहे
तू आहेस म्हणून जगण्यास अर्थ आहे”
माणसासाठी एकटे जगणे मरणप्राय असते म्हणून जीवनात कोणाची तरी सदैव साथ हवी त्यामुळेच जगण्याला अर्थ येतो नाहीतर आपले जगणे शून्य असते
कोणतेही ध्येय गाठण्यासाठी मार्गक्रमण करतांना कुणाचा तरी पाठीवरती हात असेल कुणी जर त्याला नवी उभारी देत असेल तर यश नक्की मिळते व जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो
आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की हा काव्य संग्रह चाळत असतांना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांच्या प्रत्येक कवितेत सहज न कळणाऱ्या शब्दांचा बडेजाव कुठेच दिसून येत नाही अगदी सहज सोप्प्या शब्दात त्यांनी आपल्या मनातील भावना काव्यात गुंफल्या आहेत एकूण ३७ कविता असलेला काव्य संग्रह कधी वाचून संपतो ते वाचकाला कळतही नाही अशा अप्रतिम कविता तोलून मापून निवडल्या आहे व त्या मुळे दिलेल्या शिर्षकाचे सार्थक झाले आहे.
अथक प्रयत्न व अपार मेहनत घेवून त्यांनी एम बी ए पुर्ण करून नागपूर मधील एका मोठ्या हॉस्पीटलचे मॅनेजमेंट सांभळत अनेक खस्ता खात आपल्यातल्या कवीपणाला जिवंत ठेवत आपल्या नावा प्रमाणे स्वतःच्या आयुष्याला योग्य दिशा दिल्याचे त्यांच्या कवितेतून जाणवते दुःखाना कवटाळून जगण्यापेक्षा त्यांचे पिंडदान करून माणसाने हसतमुखाने येणाऱ्या संकटांचा सामना केला पाहीजे अस त्या आपल्या दुःखांचे पिंडदान या कवितेतून म्हणतांना दिसतात
“श्वासात नवी उभारी आली
आठवणीच्या चक्रकातून
दूर निघून आली
सावली सारखी सोबत मी त्याची
सप्तपदी चालली
माझ्या हास्याच्या प्रेमात मी
दुःखाचे आज पिंडदान केले मी”
या कवयित्रने आपल्या जीवनात खूप काही सोसले असावे हे त्यांच्या कवितेतून शब्दा गणिक जाणवते व त्यांचे आपल्या आईवर नितांत प्रेम आहे त्यांना घडविण्यात आईचा मोठा वाटा असावा हे त्यांच्या आई विषयी लिहलेल्या कवितां मधून दिसून येते त्यातली ही एक कविता
“पदराखाली घट्ट धरून ती
माझा खूप लाड करायची
जणू ती मला इंद्राची
परी समजायची पण….
कळत नव्हते मला ती का रडायची
लहानपणी आपल्या आईचे आपल्या लेकीवरील उत्कट प्रेम पाहून कवयित्रीला खूप आनंद व्हायचा पण त्या वेळे आई कधीकधी पदराआड डोळे झाकून रडायची हे कोडे मात्र त्यांना कोडयात टाकत असे
आपल्या कवितां मधून हळव्या मनाच्या स्त्रीचे वर्णन उत्कटभावनेने केले आहे त्यांच्या काही कविता वाचकाला निःशब्द करतात तर काही कविता वाचून तोडातून वाह वाह अप्रतिम असे उद्दगार आपसूक निघून जातात
सर्वानी अवश्य वाचावा असा आर्त हाक काव्य संग्रह आहे या मधील जीवन सत्य आणि स्वप्न कधी न जगण्यासाठी खरे प्रेम अश्रूंची व्यथा काय सांगू माह्या गरीबीची गोष्ट आई माझ्या मनातील सारखा कविता खूपच हृदयस्पर्शी व अंतर मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत
सौ शालिनी चव्हाण बौध्दे यांच्या जरी पहीलाच काव्य संग्रह असला तरी तो इतर प्रस्थापित कवींच्या काव्य संग्रहासारखा वाचनिय आहे व तो प्रत्येकाने वाचलाच पाहीजे असं मी म्हणेन या काव्य संग्रहाचे प्रकाशन साहित्य विहार प्रकाशन नागपूर यांनी समर्पक मुखपुष्ठा सह प्रकाशित केले असून सौ आशा पांडे यांची छोटेखानी पण समर्पक शब्दांची प्रस्तावना या काव्य संग्रहास लाभली आहे आपणही हा काव्य संग्रह नक्की वाचावा व या कवयित्रीच्या प्रयत्नांना उभारी द्यावी
जयराम मोरे सोनगीर 7709565957