आळंदी देवाची,प्रतिनिधी : आळंदी शहरात कोरोणा रुग्णांचे प्रमाण वाढत असताना आळंदी शहरात आज ३ जनांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असून ७१ रुग्णांना पैकी आतापर्यंत ३० रुग्ण कोरोणा मुक्त झाले असून ४० रूग्न उपचार घेत आहे १ जन मृत झाला आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासन, आरोग्य, पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.मात्र तरीही संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आळंदी परिसरात संचारबंदी लावण्यात आली आहे.त्याचे काटेकोरपण पालन करुन जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले.
स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन,आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणा समन्वय पूर्वक काम करत आहे. कोरोनामुक्तीसाठी मास्कचा वापर, सुरक्षित अतंर राखणे, गर्दी टाळणे या नियमांचे पालन करुन स्वतःसह इतरांच्या जीवीताची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले.
मनमाड नगरपरिषद येथे सुनील कडासने यांनी मनमाड करांची साधला संवाद