आ. प्रकाश सोळंके यांनी दिली शासकीय कापूस खरेदी केंद्राला भेट

शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या अडीअडचणी
माजलगांव, प्रतिनिधी – तालुक्यात लॉक डाऊनमुळे महिनाभरापासून सर्वच केंद्रावरील शासकीय कापूस खरेदी ठप्प झाली होती. यामुळे खरिप हंगामाच्या तोंडवर शेतकऱ्यांना मोठी करावी लागत होती. ही अडचण लक्षात घेत २३ एप्रिलपासून शासनाकडून कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. माजलगांव तालुक्यातील कापूस खरेदी केंद्राला आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट देऊन कापूस खरेदी संदर्भात शेतकऱ्यांना येत असलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेतल्या तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे अश्या सूचनाही त्यांनी दिल्या.

गेल्या महिन्याभरापासून सर्व कापूस खरेदी केंद्र लॉकडाऊन झाल्याने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक राहिला. दीड महिन्यानंतर खरीप हंगाम सुरु होणार असल्याने त्यांच्या तयारीकरिता शेतकऱ्यांना पैशीची गरज आहे. कापसाच्या विक्रीअभावी शेतकऱ्यांच्या हातातही पैसा नव्हता. त्यामुळे लवकरात लवकर कापूस खरेदी सुरु व्हावी, अशी मागणी प्रकाश सोळंके, सभापती अशोक डक यांनी शासनाकडे केली होती. आमदार प्रकाश सोळंके, सभापती अशोक डक यांच्या प्रयत्नामुळे माजलगांव तालुक्यातील केंद्रावर कापसाची खरेदी सुरु झाली आहे. उन्हाळा वाढत असल्याने कापसाच्या वजनात घट होत आहे. आणखी काही काळ खरेदी बंद असती तर शेतन्यांना मोठा फटका बसला असता पण, आता माजलगांव तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकन्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगांवातील मोरेश्वर जिनिंग प्रेसिंग येथे शासकीय खरेदी सुरू असलेल्या कापूस खरेदी केंद्राला भेट दिली. यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी कापूस उत्पादक शेतकरी, जिनिंग मालक, हमाल मापाडी, यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. बीड जिल्हा उपनिबंधक बीड यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून जिनिंगच्या वेळेमध्ये बदल करावा खरेदीची वेळ सकाळी साडेसात ते दीड आणि दुपारी तीन ते सहा अशी करावी अशी मागणी देखिल केली. माजलगांव तालुक्यातील ५ खरेदी केंद्रावर शासकीय कापूस खरेदी करण्यात यावी व शेतकऱ्यांचा कापूस ३ ग्रेडमध्ये खरेदी करण्यात यावा, जिनिंग मधील रोलर ट्रॅक्टर यांना डिझेलची व्यवस्था करण्यात यावी, शेतकऱ्यांचा कवडी (फरतड) कापूस खरेदी करण्यासाठी शासन दरवारी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार सोळंके यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या वेळी माजलगांव बाजार समितीचे सभापती अशोक डक, संचालक प्रभाकरराव होके, रामेश्वर टवाणी, दिलीप सोळंके, प्रणित होके, सचिव एच. एन. सवने यांच्यासह शेतकरी, व्यापारी तसेच कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार प्रकाश सोळंके यांचे आभार मानले.

Comments (0)
Add Comment