प्रधानमंत्री कार्यालय,लघु मध्यम उद्योग मंत्रालय यांनी अर्जाची घेतली विशेष नोंद
नांदेड, प्रतिनिधी – नांदेड शहरातील व्यापारी it care syteam चे संचालक यांनी MSME नोंदणी करण्यासाठी Online पर्याय निवडला होता,यात त्यांनी नोंदणी ही केली पण त्यांना gst बिलासह १९९९ रुपये आकारण्यात आले होते,त्यांनी ते भरलेही आहेत.
(ता.५ जून)रोजी शहरातील व्यापारी केदार नांदेडकर यांनी MSME विषयी माहिती असलेल्या एका तज्ञ व्यक्तीला याविषयी विचारणा केली असता त्यांच्या निदर्शनास आले,पण फक्त ७९ रुपये नोंदणी असलेल्या ठिकाणी तब्बल १९९९ रुपये उकळले असल्याचे समजते,या “इझी टू फाईल” या कन्सल्टन्सी द्वारे आपली फसवणूक झाली आहे,तसेच त्यांनी एकापत्राद्वारे भारतभर या कंपनीने कितीजणांची फसवणूक केली असेल यांची चौकशी व्हावी म्हणून,भारताचे प्रधानमंत्री यांचे कार्यालय व लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी साहेब,राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी साहेब यांच्याकडेही याविषयी विनंतीपूर्वक अर्ज केला होता,या अर्जाची “प्रधानमंत्री कार्यालय व मध्यम उद्योग मंत्रालय” यांनी नोंद घेत वरील कन्सल्टंसी कंपनीद्वारे फसवणूक झालेल्यांची माहिती घेण्याचे आदेश दिले असता,या कंपनीच्या मालकासह सर्व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले,व त्यांनी सन्मानपूर्वक १९९९/- रुपये रक्कम आज (ता.१४ जून)सायंकाळी खात्यात जमा (अदा) केली,म्हणजेच प्रधानमंत्री कार्यालय,लघु मध्यम उद्योग मंत्रालय हे कोरोना महामारी च्या काळातही आपले कर्तव्य चोख बजावत असल्याचे या कारवाई वरून स्पष्ट होताना दिसते आहे.