इस्लामपुरात व्याजाच्या पैशाच्या तगाद्यातून व्यावसायिकाची आत्महत्या; दोघांवर गुन्हा दाखल

इस्लामपूर, प्रतिनिधी – येथील केळी व्यावसायीक प्रकाश वसंत साठे वय ४५ यांना व्याजाने दिलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावून  मोटरसायकल जबरदस्तीने काढून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देत  आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महेश शंकर पाटील (वय ३५  रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर) व प्रविण बाबासो पाटील (वय ३५ रा. सिध्देश्वरनगर इस्लामपूर) या दोन संशयीतांविरूध्द इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. मनिषा प्रकाश साठे रा. इस्लामपूर यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून  मिळालेली माहिती अशी,प्रकाश वसंत साठे हा केळी विक्रीचा व्यवसाय करत होते. कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊ नमुळे त्यांचा हा व्यवसाय बंद पडला होता. मार्च २०२० मध्ये प्रकाश यांनी धंद्यासाठी महेश पाटील याच्याकडून १० हजार रूपये व्याजाने घेतले होते. मे महिन्यात महेश पाटील व प्रविण पाटील हे प्रकाश यांना वारंवार फोन करून तसेच घरी येवून व्याजाचे पैशाची मागणी करत होते. यावेळी लॉकडाऊ नमुळे माझा धंदा बंद आहे. मी धंदा चालू झाला की तुमचे सर्व पैसे परत करतो असे सांगत होते. त्यानंतरही ते वारंवार पैशाची मागणी करू लागले. दि. १५ सप्टेंबर रोजी वाघवाडी फाटा येथे मालाची गाडी खाली करण्यासाठी गेले होते. यावेळी प्रविण व महेश यानी पैशाची मागणी करत प्रकाश यांची मोटरसायकल क्र. एम.एच.१० डी.बी.७१७५ ही जबरदस्तीने काढून घेतली. व व्याजाचे पैसे दिले नाहीतर ठार मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर दि. १७ रोजी प्रकाश यांची पत्नी माहेरी साठेनगर येथे गेली होती. यावेळी प्रकाश याने मी पैसे आणण्यासाठी बाहेर जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांची पत्नी मनिषा हिने मुलास घरी पप्पा आलेत का हे पाहण्यासाठी पाठवून दिले. यावेळी त्याने घरी जावून पाहिले असता प्रकाश हा घरीच होता. मात्र हाक मारली तरी दरवाजा उघडत नाही असे मनिषा हिला सांगितले. त्यांनतर मनिषा हि घराकडे गेली असता प्रकाश हे दरवाजा उघडत नसल्याचे भाऊ अमोल याला फोन करून बोलवून घेतले. अमोल हा त्याठिकाणी आला असता त्याने घराच्या खिडकीची काच फोडून पाहिली असता. प्रकाश याने घराच्या लाकडी वाश्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केली होती. याबाबत मनिषा प्रकाश साठे यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

मयत प्रकाशच्या खिश्यामध्ये पोलिसांना चिठ्ठी मिळून आली. यामध्ये मी देणेक-यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. सध्या लॉकडाऊ न  चालू आहे. कामधंदा बंद आहे. अशा वेळी देणेक-यांचे पैसे देवू शकत नाही. गुंडगिरीच्या जोरावर मला त्रास देणे चालू आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या घरच्यांना त्रास देवू नये. खरा गुन्हेगार शोधा मला माफ करा… माझी गाडी घरी द्या.असा मजकूर लिहून त्याखाली सही करून महेश पाटील व प्रविण पाटील याना त्रास देवू नये नंतर ते घरच्यांना त्रास देतील असा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिला आहे. ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

Comments (0)
Add Comment