नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी शेतकरी व व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला. कोरोनाच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण देश त्रस्त असताना द्राक्ष बाग काढनीचा हंगाम जोरात सुरु असताना कलम 144, संचारबंदी लागली असताना बाहेरच्या राज्यांच्या तसेच जिल्हा सीमा बंद (सिल) केल्याच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच द्राक्ष व्यापाऱ्यांच्या द्राक्षमालाचे कंटेनर हे मिरझापुर येथील रस्त्यावर दोन दिवस अडवून धरण्यात आले.
खा.डॉ. भारती पवार यांच्याशी व्यापाऱ्यांची चर्चा झाल्या नंतर तात्काळ उत्तर प्रदेश मधील मिरझापूर जिल्ह्यात अटकलेले सर्व ट्रक हे स्थानिक पोलीस आयुक्त मिर्ज़ापुर यांचेशी संपर्क साधून सोडण्यात आले. त्यानंतर खासदार डॉ.भारती पवार यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की शेतकरी व व्यापारी यांनी हवालदिल होऊ नये! घाबरून जाऊ नये! तसेच कोणत्याही अफवेला बळी पडू नये!
खा.डॉ.भारती पवार यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या काळजीबद्दल शेतकरी व व्यापारी वर्ग यांच्याकडून आभार मानून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.