उद्योजकांच्या वीज ,पाणी बील विषयक अडचणी सोडवू :उद्योग मंत्री

‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ’ शिष्टमंडळाची बैठक यशस्वी

पुणे,प्रतिनिधी : राज्य शासनाच्या औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांना कोरोना लॉक डाऊन काळात कारखाने बंद असतानाही वीज आणि पाणी वापराची जी बिले(मिनिमम चार्जेस बिल) आली आहेत,ती माफ करण्यासाठी सरकार सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करेल असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी दिले.

‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल’ शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांना आलेल्या वीज,पाणी वापरासंदर्भात येणारी मिनिमम चार्जेस ही बिले माफ करण्याची मागणी केली. कोरोना लॉक डाऊन काळात कारखाने बंद असतानाही वीज आणि पाणी वापराची जी बिले(मिनिमम चार्जेस बिल) आली आहेत,ती माफ करण्यासाठी शासनाने निर्णय घेऊन उद्योजकांना दिलासा द्यावा,अशी मागणी शिष्ट मंडळाने केली. सरकारच्या समोर हा प्रस्ताव असून बिल माफ करण्यासाठी सरकार सहानुभूतीपूर्वक प्रयत्न करेल असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिले.

कोरोना लॉक डाऊन काळात उद्योजकांचे झालेले नुकसान पाहता,बँकांनी पुढील काळात त्यांना सुलभ कर्ज द्यावे,असे सरकारचे निर्देश असतानाही बँका याबाबतीत चाल ढकल करीत असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने उद्योग मंत्र्यांच्या निदर्शनास आणले.नव्या परिस्थितीत उद्योग उभारणी करण्यासाठी सरकार बँकांना योग्य ते निर्देश देईल,असे आश्वासन सुभाष देसाई यांनी यावेळी दिले.

‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल’ शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल,उद्योजक भाऊसाहेब जंजिरे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

‘कोरोना किलर ‘ इलेक्ट्रॉनिक उपकरणाची उद्योग मंत्र्यांकडून पाहणी

pune
Comments (0)
Add Comment