माजलगांव,प्रतिनिधी:- तालुक्यातील जदिद जवळा येथील कोव्हिड-१९पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभुमिवर प्रशासनाने जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून उपविभागीय अधिकारी शोभा ठाकुर यांनी कंन्टेनमेट झोन असलेल्या जदिद जवळा येथे भेट देवून नागरिकांशी संवाद साधून दक्षतेच्या सुचना दिल्या.
माजलगांव तालुक्यात कोव्हिड-१९ च्या पार्श्वभुमिवर प्रशासन सुरूवातीपासूनच सतर्क आहे. त्यानूसार दोन दिवसापूर्वी जदिद जवळा येथील कोव्हिड-१९ पॉझिटीव्ह रूग्ण आढळला. यावर उपविभागीय अधिकारी शोभा ठाकुर यानी गुरूवार १६ जुलै गुरुवार रोजी भेट दिली. याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना ठाकूर म्हणाल्या, कोव्हिड-१९चा रूग्ण आपल्या गावात निघाला आहे. त्यामुळे घाबरून न जाता काळजी घ्यावी. तसेच गावात बाहेरील व्यक्तींना प्रवेश देवू नये, तसेच गावातील व्यक्तींनी बाहेर जावू नये.
होमक्वारटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून जिवनावश्यक उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रशासन योग्य पध्दतीने काम करत असून आपण कोव्हिड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी दिलेल्या सुचनाचे पालन करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण, नायब तहसिलदार एस.एस.रामदासी, ग्रामीण ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके, सरपंच कृष्णा बोचरे, ग्रामसेवक, आशासेविका आदी उपस्थित होते.
नायबतहसीलदारांचा शिष्टाचार भंग. राजप्रशासन सेवेतील उपजिल्हाधिकारी हे सुपर क्लास वन म्हणजे सर्वोच्च अधिकारी आहे आणि राजशिष्टाचारा प्रमाणे सार्वजनिक कार्यक्रम वगळता आपदग्रस्त आपत्ती स्थळी संबंधीत अधिकारी भेटायला गेले तर त्यांच्या सोबत त्यांच्या कार्यालयातील किंवा तहसील कार्यालयातील दुय्यम जर्दाचे अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित असतो व उपजिल्हाधिकारी लोकांशी संवाद साधत असताना सर्व कर्मचारी बाजूला उभेच राहावेत.
असा शिष्टाचार आहे त्यानुसारच वर्ग-१चे गटविअ.सह उपस्थित होते ते सर्व अधिकारी बाजूला उभे राहिले होते पण नायब तहसीलदार शामसुंदर रामदासी यांनी तो भंग केला असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. कारण उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर या उभे राहून संवाद साधतानाच्या फोटोत रामदासी बाजूला खूर्चीत पायावर पाय ठेवून नामदारां सारखे बसल्या चे फोटो समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने शिष्टाचार भंगाची कारवाई करण्यात येईल का. असा प्रश्न विचारला जात आहे.
आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….
गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});