एस.एम.देशमुख यांच्या हस्ते देवडी येथे सँनिटायझरचे वाटप

माजलगांव, प्रतिनिधी – देवडी येथील ग्रामपंचायतच्या वतीने गावातील नागरिकांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते नुकत्याच सॅनेटाझर्सच्या ८०० बॉटल्सचे वाटप सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून करण्यात आले.
तालुक्यातील देवडी ग्रामपंचायतच्या वतीने नागरिकांना कोरोना विषाणू रोखण्यासाठी सँनिटायझर बाँटल चे वाटप मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा देवडी गावचे भुमीपुत्र एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी एस. एम.देशमुख यांनी सॅनेटाझर्सचा वापर कसा करायचा याची माहिती दिली.. तसेच कोरोना विरोधी लढयात प्रत्येक नागरिकांची भूमिका कशी आणि किती महत्वाची आहे हे उपस्थितांना पटवून दिले.. शेतीची कामं तर झालीच पाहिजेत पण ही कामं करताना सोशल डिस्टस्टिंगचे पथ्य पाळले गेले पाहिजे तसेच शेतातून घरी परतल्यानंतर आपले हात साबणाने धुतले पाहिजेत.. घरातून बाहेर पडताना तोंडाला रूमाल बांधला पाहिजे असे आवाहन देशमुख यांनी केले..गरज नसेल तेव्हा घरातच बसणे आवश्यक असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.. यावेळी
सरपंच जालिंदर झाटे, उपसरपंच गवरचंद आगे, तलाठी प्रमोद चव्हाण, ग्रामसेवक अविनाश राठोड, शाळेचे मुख्याध्यापक सुर्यकांत आंबुरे सर आदी यावेळी उपस्थित होते.नंतर ग़ामपंचायतच्यावतीने घरोघरी बाटल्यांचे वितरण करण्यात आले.यावेळी
ग्रामपंचायतचे कर्मचारी बाबासाहेब झाटे, बाळासाहेब काकडे, रंगनाथ सोळंके ,याकूब शेख,आदींनी परिश्रम घेतले.

Comments (0)
Add Comment