कत्तलीसाठी डांबुन ठेवलेल्या 11 गोवंशाची गंगापूर पोलिसांकडून सुटका

गंगापूर,दि 10 (प्रतिनिधी)ः
 कत्तलीसाठी डांबुन ठेवलेल्या अकरा गोवंशाचे प्राण स्थानीक पोलीसांनी वाचवले या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून सर्व गोवंश येथील गोशाळेत सोडण्यात आले.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मज्जित कुरेशी मोहल्ला येथील अलीम शेख याने कत्तलीसाठी जनावरे आणले असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी पोलीसांना पाठवुन धाड टाकली असता शेख यांच्या गोठ्यात  सात गाय, दोन बैल, दोन लहान वासरे असे अकरा गोवंश त्यांची अंदाजे किंमत एक लाख 21 हजार रुपये हे अकरा गोवंश गोठ्यात कत्तलीसाठी दाबून ठेवल्याने त्याच्यावर छापा मारून आरोपी अलीम शेख याला दुपारी एक वाजता पकडून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय लोहकरे  पोलीस उपनिरीक्षक शकील शेख  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश काथार पोलीस नाईक अमीत पाटील, सोमनाथ मुरकुटे, योगेश हरणे पोलीस कॉन्स्टेबल वडमारे आदींनी ही कारवाई केली.  पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश काथार हे करीत आहेत.

Comments (0)
Add Comment