कन्नड , प्रतिनिधी – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथे अज्ञात व्यक्ती कडुन तोडफोड करण्यात आली.. त्या अज्ञात आरोपीवर सखोल चौकशी करून कडक शिक्षा देण्यात यावी राजगृह हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतके महत्वाचे ठिकाण असुन अस्मितेचे स्थान आहे. अशा भ्याडपणाचा हल्ला करणा-या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी.
अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव अनिल भाऊ सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी चे कन्नड तालुक्याचे कार्यकर्ते तातेराव भुजंग ( भारीपचे मा. तालुका महासचिव ) सुभाष सिरसाठ ( आलापुर ) , गणेश मोरे, अमोल साळवे , कडुबा पवार, अमृता चौगुले , विनोद कदम यांच्या सह कार्यकर्त्याच्या उपस्थितीत कन्नड तहसिल चे नायब तहसीलदार स्वप्निल खुल्लम यांना निवेदन देण्यात आले.
न्यायालयात वाढदिवस साजरा, ११ वकीलांवर गुन्हा दाखल
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});