शिर्डी ,प्रतिनिधी – जगासह देशात कोरोना महामारी चां मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून यामध्ये कोरोना लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे आरोग्य कर्मचारी, पोलिस विभाग, महसूल विभाग,स्वच्छता विभाग, तसेच जनतेला या महामारी विषयी माहिती देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करणारे पत्रकार मंडळी यासर्वाच्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे त्यांच्या कामाबद्दल सन्मान केला पाहिजे म्हणून अनेक सामाजिक संस्था ह्या सर्व व्यक्तीचे मनोधैर्य वाढवण्याच्या हेतूने कोवीड योध्दा पुरस्कार देण्यात आले आहे.
शिर्डी येथील अत्यंत कमी वयात नावाजलेले व्यक्तिमत्व पत्रकार कुमारी किरण गोरख जाधव यांचा शौर्य मराठी न्यूज नेटवर्क (औरंगाबाद) तसेच आर के न्यूज मराठी शिर्डी यांच्यावतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. कु.किरण जाधव ह्या केंद्रीय पत्रकार संघ अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष आणि शौर्य मराठी न्युज चे सहसंपादक आहेत.
सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांना त्यांच्या स्वतःची काळजी घेणे, सैनीटायझर ने सतत हात धुणे आणि अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडणे, मास्क चा वापर करणे, आणि सोशल डिस्टन्स ठेवणे या सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला मदत करण्यात यावी नागरिकांचे मनोबल वाढवल्याने आणि जनजागृतीचे काम केले असून कु.किरण जाधव यांनी गोरगरिबांना मदत करण्याचे काम केले आहे.
तसेच परशुराम सेवा संघ अहमदनगर यांच्या वतीने श्री.कमलेश शेवाळे (महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख) यांच्या मार्फत कु.किरण जाधव यांना covid योद्धा सन्मानपत्र देण्यात आले आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना कु.किरण जाधव यांनी सांगितले की,समाजसेवा करण्यातच ईश्वर सेवा आहे.यापुढेही समाजाच्या हितासाठी काम करेल असे त्यांनी सांगितले. तसेच कु.किरण जाधव यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मान मिळाला असून, मिळालेल्या सन्मान बद्दल सर्वच स्थरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.
आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….
गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});