केलेल्या दाढीचे पैसे मागितले सलूनचालक व कारागीर ला जखमी केले.

माजलगांव,प्रतिनिधी:- तालुक्यातील लोणगाव कॅप येथील एका हेअर कटींग सलून मध्ये एका तरुणाने दाढी करून घेतली त्याचे पैसे कमी दिले योग्य मोबदला द्या म्हणणाऱ्या सलून चालक व त्यांच्या कारगीराला सहाजणांनी मिळून काठ्या व लोखंडी गजाने केलेल्या बेदम मारहाणीत दोन्ही गंभीर जखमी झाल्याच्या फिर्यादी नुसार दिंद्रुड पोलीस ठाण्यात सहा आरोपी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी माहिती अशी की, लोणगाव कॅप येथे गोविंद लक्ष्मण राऊत रा.संतनगर,लोणगाव यांचे हेअर कटिंग सलून आहे आणि त्या ठिकाणी १९जुलै रविवार रोजीच्या दुपारी २:३०वा.दरम्यान जयदत्त बाबुराव पवार रा.सोमनगर तांडा तहत लोणगाव हा तरुण दाढी करण्यासाठी आला आणि त्याची दाढी करून झाल्यावर त्याने कमी पैसे दिले यावर बरोबर योग्य पैशाची मागणी केली असता त्याने हुज्जत घालून रविराज बाबुराव पवार, संजय बाबुराव पवार,विजय भंगी पवार, बाबुराव पवार, बंटी रमेश पवार यांना बोलावून घेतले आणि त्यासर्वांनी मिळून गोविंद राऊत व त्यांच्या कारगीराला शीवीगाळ करून चापटाबुक्यांनी मारहाण करत लोखंडी गजाने वार करून गंभीर जखमी करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

अशी फिर्याद गोविंद यांनी १९जुलै रविवार रोजीच्या रात्री १०:२३वा.दिंद्रुड पोलीस ठाण्यात दिल्याने नमूद नामे सहा आरोपी विरोधात गूरनं.१६२/२०२०वरुन भादंवि. कलम १४३,१४७,१४९, 324,504,506 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास पोहे काँ.चौरे करत आहेत.

ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय राजकीय हेतूने नाही-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

beedबीडमाजलगांव
Comments (0)
Add Comment