भिवंडी : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पूर्ण महाराष्ट्र बंद होत असताना २२ मार्च २०२० रोजी भिवंडी तालुक्यातील पडघा देखील कडकडीत बंद दिसून आला. यावेळी पडघा बाजारपेठ, अन्य दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
पडघा अनेक गावांचा केंद्रबिंदू मानला जातो. म्हणून पडघा ही अनेक गावांची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. तर रविवारी आठवडा बाजार हा मोठ्या प्रमाणात भरविला जातो. परंतु कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पडघा बाजारपेठ कडकडीत बंद दिसून आली. यामध्ये बंद मध्ये नागरिकांनी चांगले सहकार्य केले असून पडघा पोलीस स्टेशनचे पोलीस विविध ठिकाणी तैनात करण्यात आले होते.
सदर कोरोना वायरसचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरून बंदचे आदेश येताच आम्ही काही दिवसापूर्वीच पडघा बाजारपेठ तसेच व्यापारी मंडळात जनजागृती करून पडघा कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले होते. असे पडघा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेश मनोरे यांनी बोलताना सांगितले.