पालम, प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या संकट काळातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांची सेवा करण्यासाठी पालम तालुक्यातील माजी सैनिक सज्ज झाले आहेत.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असून पोलीस प्रशासनावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे पालम तालुक्यातील माजी सैनिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे ठरवले असून देश सेवेसाठी हे सैनिक सज्ज झाले आहेत. या संदर्भामध्ये माजी सैनिकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी सुभेदार काशीराम पोळ यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे ठराव करण्यात आले. लॉक डाऊनच्या परिस्थितीमध्ये पालम तालुक्यातील माजी सैनिक प्रशासनाला मदत करण्यासाठी रुजू झाले आहेत. पोलीस प्रशासनही त्यांच्या सोबत आहे. यात कॅप्टन डी. एस. वाघमारे, सुभेदार काशीराम पोळ, एस.आय. विलास वाघमारे, एस.आय. नामदेव उगले, गुडाळे नामदेव आदींचा समावेश आहे.